MS Dhoni  saam tv
Sports

४० मिनिटं विकेटकिपिंग, १ तास फलंदाजी; एमएस धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार?

ms dhoni news : एमएस धोनीने काल वानखेडे स्टेडिअमवर सराव केला. त्यामळे धोनीच्या कमबॅकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र सिंह धोनीचा वानखेडे स्टेडियमवर सराव

धोनीच्या आयपीएलमध्ये कमबॅकची चर्चा

मुंबई-चेन्नई सामन्यात धोनी खेळण्याची चर्चा

चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार आणि विकेटकिपर फलंदाज महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी अथक मेहनत घेताना दिसत आहे. त्याने २१ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर तब्बल ४० मिनिट विकेटकिपिंगचा सराव केला. त्यानंतर १ तास फलंदाजीचा सराव केला. धोनीने सरफराज खान आणि उर्विल पटेलसोबत विकेटकिपिंग देखील केली. त्यामुळे धोनीच्या आयपीएलमधील कमबॅकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धोनीला पहिल्या सहा सामन्यात संघात स्थान मिळालं नाही. चेन्नई सध्या पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. टीमचा रन रेट देखील नकरात्मक आहे. आता चेन्नईचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सहापैकी ४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. परंतु त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. मुंबईने गुजरात टायटन्सच्या विरोधात ९९ धावांनी मोठा विजय मिळवला होता. सलग चार सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबईने मोठा विजय मिळवलाय.

सनरायजर्स हैदराबादच्या विरोधात चेन्नईला चांगल्या फिनिशरची गरज भासली होती. मॅथ्यू शॉर्टच्या संथ खेळीने संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. तर शिवम दुबे आणि जेमी ओवरटनला लक्ष्याचा पाठलाग करणे अवघड झाले. आता जर ४४ वर्षीय धोनीने खालच्या फळीत उतरून हातभार लावला तरी चेन्नई संघाला मोठा फायदा होऊ शकतो.

मुंबई इंडियन्सला दिलासा

इंग्लंडचा खेळाडू विल जॅक्सची देखील मुंबईच्या संघात एन्ट्री झाली आहे. जैक्स वैयक्तिक कारणामुळे सहा सामने खेळला नाही. आता विलची एन्ट्री झाल्याने मुंबई इंडियन्सला मोठा फायदा होणार आहे. रोहित शर्मा जर चेन्नईच्या विरोधात खेळला नाही, तर जॅक्स आणि व्किंटन डिकॉक ओपनिंग करायला उतरू शकतात. जॅक्स खालच्या फळीत देखील फलंदाजी करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT