MS Dhoni Likely To be Retire From IPL SAAM TV
Sports

MS Dhoni News: आँss काय सांगता..! महेंद्रसिंह धोनी खरंच पुढची IPL स्पर्धाही खेळणार?

MS Dhoni : धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. आयपीएलमधूनही संन्यास घेणार का असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला होता.

Nandkumar Joshi

MS Dhoni Likely To be Retire From IPL : यूएईमध्ये २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा अखेरचा सामना झाला होता. एम. एस. धोनी कर्णधार होता आणि आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पात्र न ठरता चेन्नई संघ स्पर्धेबाहेर गेला होता. त्याच्या काही दिवस आधीच धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. अशावेळी आयपीएलमधूनही संन्यास घेणार का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी अजिबात नाही असं उत्तर धोनीनं दिलं होतं. त्यानंतर आता आयपीएलचा तीन सीझननंतर पुन्हा धोनीच्या निवृत्तीबाबतचा मुद्दा चर्चेत आला आहे.

आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी ३ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात नाणेफेकीदरम्यान पुन्हा महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. तीन वर्षांपूर्वी यूएईमध्ये हाच प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसननेच यावेळी चेष्टेतच धोनीला अखेरचे पर्व असल्याचे विचारले. त्यावर धोनीनेही हे फक्त मॉरिसन बोलत आहेत. मी नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे तो पुढील पर्वातही चेन्नईकडून खेळेल, असे संघ व्यवस्थापन आणि त्याच्या चाहत्यांना वाटणे स्वाभाविकच आहे.

फिटनेसबाबत अनेक प्रश्न

धोनी खरंच पुढची आयपीएल स्पर्धा खेळणार का? जर पुन्हा धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले तर हा प्रश्न पुन्हा विचारला जाऊ शकतो. पण धोनीच्या फिटनेसबाबत आताच प्रश्न उपस्थित होत आहेत. धोनीच्या पायाला दुखापत झालीय. चेन्नई-गुजरात यांच्यातील सामन्याच्या आधी धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, तो सामना खेळू शकणार नाही, असे वृत्त आले होते. त्यानंतर चेन्नईचे नऊ सामने झाले आहेत आणि त्या सर्व सामन्यांत धोनी खेळला आहे. पण काही सामन्यात धोनी दुखापतीने त्रस्त असल्याचे सगळ्यांनीच बघितले.

धोनी आधीपेक्षा या सीझनमध्ये अधिक फिट दिसतो. पण गुडघ्याची दुखापत त्याच्या आयपीएलच्या पुढच्या प्रवासातील मोठा अडथळा ठरू शकते. याचमुळे कदाचित धोनी प्रत्येक सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये किंवा काही चेंडू शिल्लक असताना मैदानात फलंदाजीसाठी उतरतो.

दुसरं कारण आश्चर्यकारक

धोनी पुढची आयपीएल स्पर्धा खेळू शकतो, याचं दुसरं कारणही आश्चर्यकारक आहे. पायाच्या दुखापतीमुळे धोनीला विकेटकीपिंग करताना त्रास जाणवतोय. पण आयपीएलमधील कामगिरी बघितली तर, यष्टीमागे अशी कामगिरी क्वचितच इतर कुणी केली असावी. अनेक वेळा त्याने वेगाने केलेली स्टम्पिंग किंवा धावबाद करण्याचे त्याचे कौशल्य आजही चक्रावणारेच आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धोनीने पुन्हा टीम इंडियाकडून खेळावे, असे क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

SCROLL FOR NEXT