Expensive Over In Cricket: फलंदाज जोमात गोलंदाज कोमात! एकाच षटकात फलंदाजाने ठोकल्या तब्बल ४६ धावा; वाचा कुठे घडलं

Viral Cricket Video: एका गोलंदाजाने एका षटकात गोलंदाजी करताना तब्बल ४६ धावा खर्च केल्या आहेत
viral video
viral videotwitter
Published On

Viral Video: क्रिकेटमध्ये एका षटकात किती धावा केल्या जाऊ शकतात? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला. तर तुम्हाला तुम्ही म्हणाल ३६ धावा. जर गोलंदाजाने वाईड - नो टाकले तर २-३ अधिकच्या धावा येऊ शकतात.

मात्र एका गोलंदाजाने गोलंदाजी करताना इतक्या धावा दिल्या आहेत की, आकडा ऐकून तुमची पायाखालची जमीन सरकेल.

viral video
Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

एका गोलंदाजाने एका षटकात गोलंदाजी करताना तब्बल ४६ धावा खर्च केल्या आहेत. हा कारनामा आंतरराष्ट्रीय सामन्यात नव्हे तर एका लोकल टुर्नामेंटमध्ये करण्यात आला आहे. केसीसी फ्रेंडली मोबाईल टी -२० चॅम्पियन्स ट्रॉफीत हरमन सिंगने ही नकोशी कामगिरी केली आहे.

चौकार षटकारांचा पाऊस..

या सामन्यात हरमन सिंगच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना फलंदाजाने ६ षटकार आणि ४ चौकार मारले. पहिला चेंडू नो बॉल होता, ज्यावर वासुदेव दातलाने षटकार मारला. पुढचा चेंडू यष्टिरक्षकाने सोडला ज्यावर फलंदाजी करत असलेल्या संघाला बाय स्वरूपात ४ धावा मिळाल्या. पुढील ५ चेंडूवर फलंदाजाने सलग ५ षटकार मारले. यात १ चेंडू नो बॉल होता ज्यावर फलंदाजाने षटकार मारला होता. तर शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. या षटकात त्याने तब्बल ४६ धावा वसूल केल्या. (Latest sports updates

या सामन्यात एनसीएम संघाने तुफान फटकेबाजी करत २० षटक अखेर २८२ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टॅली सीसी संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. टॅली सीसीचा संघ १५.२ षटक अखेर ६६ ऑल आऊट झाला. हा सामना एनसीएम संघाने २१६ धावांनी आपल्या नावावर केला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करण्याचा विक्रम हा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे आहे. तो गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहने त्याच्या षटकात ३५ धावा कुटल्या होत्या. हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडं षटक आहे. तर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराज सिंगने टी -२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार मारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com