Mahendra Singh Dhoni Saam TV
क्रीडा

MS Dhoni Car-Bike Collection: एमएस धोनीचं बाईक प्रेम! लाखोंच्या बाईक अन् कोट्यवधींच्या कार; पाहा संपूर्ण कलेक्शन

Mahendra Singh Dhoni's Car And Bike Collection: भारतीय संघाचा माजी खेळाडू एमएम धोनीचं बाईक अन् कारवर प्रचंड प्रेम आहे.

Mayur Gawande

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा बाईक आणि कारचा प्रचंड चाहता आहे. धोनी बाईक आणि कार चालवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. धोनीकडे जवळपास 100 पेक्षा अधिक दुचाकी आहे. तर लक्झरी आणि व्हेंटेज कार आहेत. धोनीच्या रांचीमधील घरी एक मोठे गॅरेज आहे. जिथे तो त्याच्या सर्व बाईक आणि दुचाकी पार्क करतो. त्याचे व्हीडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

धोनीकडे सर्व प्रकारच्या जुन्या आणि आधुनिक बाईक आहेत. क्रिकेट सामन्यातून काही पैसे कमावल्यानंतर त्याने यामाहा RX100 ही सेकंड हँड दुचाकी घेतली. तर RD350 ही धोनीची आवडती बाईक आहे.. राजदूत ही धोनीच्या पहिल्या बाईकपैकी एक असल्याचं सागितलं जातं. तर धोनीने त्याच्या फार्महाऊसमध्ये काम करण्यासाठी ट्रॅक्टर देखील घेतला आहे.

धोनीकडे असलेल्या प्रसिद्ध दुचाकी

  • हार्ले डेविडसन फैट बॉय (Harley-Davidson Fat Boy)

  • कॉन्फेडरेट हेलकैट एक्स132 (Confederate Hellcat X132)

  • डुकाटी 1098 (Ducati 1098)

  • कावासाकी निंजा एच 2आर (Kawasaki Ninja H2)

  • कावासाकी निंजा zx-14r (Kawasaki Ninja ZX-14R)

  • यमाहा थंडरकॅट (Yamaha Thundercat)

  • बीएसए गोल्ड स्टार (BSA Gold Star)

  • यामाहा RD 350 (Yamaha RD350)

  • नॉर्टन ज्युबिली 250 (Norton Jubilee 250)

धोनीकडील प्रसिद्ध कार

  • किआ EV6 (KIA EV6)

  • हमर H2 ( Hummer H2 )

  • ऑडी Q7 (Audi Q7 )

  • मित्सुबिशी पजेरो (Mitsubishi Pajero)

  • रोल्स रॉयस सिल्व्हर शॅडो ( Rolls-Royce Silver Shadow)

  • मर्सिडीज बेंझ (Mercedes-Benz GLE)

  • लँड रोव्हर फ्रीलँडर (Land Rover Freelander 2)

या बाईक आणि कारवर धोनी फेरफटका मारताना दिसून येतो. माहीच्या कार कलेक्शनमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओचाही समावेश आहे. ती कार कलेक्शनमधील सर्वात कमी महागडी कार आहे. धोनी त्याच्या सोशल मीडियावर देखील बाईक आणि दुचाकीचे व्हिडिओ शेअर करतो.

धोनीची एकूण संपत्ती 1040 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. धोनी अनेक कंपन्यांचा ब्रँड अँबेसिडर देखील आहे. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने हॉटेल आणि विविध कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. माही हा मूळचा झारखंडचा आहे. धोनीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये फक्त चैन्नई सुपर किंगकडून खेळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT