swastik chikara saam tv
Sports

RCB चा ज्युनिअर ख्रिस गेल! 52 षटकार, 55 चौकारांसह 585 धावा चोपणारा हा फलंदाज आहे तरी कोण?

Swastik Chikara, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात अशा एका खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ज्याने ५८५ धावांची खेळी केली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. या स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे.

ही अशी स्पर्धा आहे जी, कुठल्याही खेळाडूला एका रात्रीत स्टार करु शकते. बरेच खेळाडू आहेत,ज्यांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं आहे. असाच एक खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात देखील आहे, जो आपल्या हार्ड हिटींगसाठी ओळखला जातो.

कोण आहे १९ वर्षांचा फलंदाज?

आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात अशा एका खेळाडूला स्थान देण्यात आलंय ज्याने शतक, द्विशतक नव्हे, तर एकाच डावात ५८५ धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने सर्वच रेकॉर्ड्स मोडून काढले होते. आम्ही बोलतोय १९ वर्षीय फलंदाज स्वास्तिक चिकारा बद्दल. या विस्फोटक फलंदाजाला आरसीबीने मेगा लिलावात ३० लाखांची बोली लावून संघात स्थान दिलं होतं.

हा फलंदाज ५८५ धावांची खेळी केल्यामुळे चर्चेत आला होता. या फलंदाजाने हा कारनामा वयाच्या १४ व्या वर्षी करुन दाखवला होता. या खेळीदरम्यान त्याने अवघ्या १६७ चेंडूंचा सामना करत ४४ चौकार आणि ५२ षटकार खेचून ५८५ धावा चोपल्या होत्या.

या युवा फलंदाजाने हा कारनामा २०१९ मध्ये करून दाखवला होता. त्याने माही क्रिकेट अॅकेडमी आणिमच एसीई क्रिकेट अॅकेडमी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. दोन्ही संघांमध्ये ४० षटकांचा सामना पार पडला होता. या सामन्यात माही क्रिकेट अॅकेडमीने एकूण ७०४ धावांचा डोंगर उभारला होता.

यासह हा सामना ३५५ धावांनी आपल्या नावावर केला होता. तेव्हापासूनच या खेळाडूवर सर्वांची नजर होती. आगामी हंगामापूर्वी झालेल्या लिलावात आरसीबीने त्याला ३० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं.

ही कामगिरी त्याने ६ वर्षांपूर्वी केली होती. मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये त्याला ३६ धावा करता आल्या. आता त्याला आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळणार का? संधी मिळाली तर तो चांगली कामगिरी करणार का? यावरही सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT