ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही लोक चांगल्या आरोग्यासाठी सप्लिमेंट्स घेतात, जे कधीकधी शरीरासाठी हानिकारक ठरतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय सप्लिमेंट्स घेणे टाळावे.
आज आम्ही तुम्हाला अशा सप्लिमेंट्सबद्दल सांगणार आहोत, जे एकत्र घेतल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते.
जर तुम्ही मेलाटोनिनसोबत इतर औषधे घेतली तर त्यामुळे जास्त झोप येणे, चक्कर येणे आणि संतुलन बिघडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे सप्लिमेंट्स एकत्र घेऊ नयेत. यामुळे पोटात वेदना होऊ शकतात.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आयरन, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम घेऊ नयेत. याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
कॅल्शियम आणि आयरन सप्लिमेंट्स एकत्र घेऊ नयेत. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, एका वेळी फक्त एकच सप्लिमेंट घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
झिंक आणि कॉपर दोन्ही सप्लिमेंट्स शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. परंतु दोन्ही सप्लिमेंट्स एकत्र घेतल्याने मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.