Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Ahilyanagar School : महाराष्ट्रातील श्रीरामपूरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचा ट्रक उतरवण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. साम टीव्हीच्या वृत्तानंतर, अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
Ahilyanagar School
Students forced to unload school books truck in Shrirampur; authorities order action.saam tv
Published On
Summary
  • श्रीरामपूरमध्ये विद्यार्थ्यांकडून ट्रक उतरवण्याचा प्रकार समोर.

  • शालेय पुस्तकं उतरवण्यासाठी लहान मुलांचा वापर.

  • साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनाची दखल.

  • गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी व कारवाईचे आदेश दिले.

शासनाकडून आलेल्या शालेय पुस्तकांचा ट्रक खाली करण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात समोर आलाय. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईचे करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शालेय पुस्तकांनी भरलेला ट्रक आला होता. मात्र पुस्तकांचे बंडल खाली करताना चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा व्हिडीओ साम टिव्हीने समोर आणला होता. मुख्याध्यापक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने पालकवर्गात नाराजी होती.. साम टिव्हीने वृत्त प्रसारित केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com