team india saam tv
Sports

Kapil Dev On Indian Players: 'भारतीय खेळाडू पैशांच्या अहंकारात बुडालेत..' विश्वविजेत्या कर्णधाराची सडकून टीका

Kapil Dev Statement: माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय खेळांडूवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. गेल्या काही वर्षात बीसीसीआयने कमाईच्या बाबतीतही मोठी प्रगती केल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डच्या कमाईसह खेळाडूंच्या कमाईतही वाढ झाली आहे.

वार्षिक करारानूसार खेळाडूंना कोट्यवधी रुपये मानधन दिले जाते. याबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय खेळांडूवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय संघाला वेस्टइंडीज विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाबाहेर होते.

तर संजू सॅमसनला संघात स्थान दिले गेले होते. या सामन्यात भारतीय संघाचे पितळं उघडं पडलं होतं. या सामन्यातील पराभवानंतर कपिल देव भारतीय भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचं म्हणण आहे की, जास्त पैसा आल्याने खेळांडूमध्ये अंहकार येतो. भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. (Latest sports updates)

कपिल देव भारतीय खेळाडूंवर टीका करत म्हणाले की,'कधी कधी खूप पैसा आला की अहंकार येतो. भारतीय खेळाडू पैशांच्या अहंकारात बुडाले आहेत. या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. हे खेळाडू पैशाच्या गर्वात माजी खेळाडूंचा सल्ला घेत नाहीत आणि तीच चूक पुन्हा पुन्हा करतात.'

मंगळवारी रंगणार निर्णायक सामना..

भारत- वेस्टइंडीज वनडे मालिकेतील अंतिम वनडे सामना १ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. मालिकेतील पहिला वनडे सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता मालिकेतील निर्णायक सामना त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT