Momiji Nishiya  Twitter/ @@Tokyo2020hi
Sports

अवघ्या 13 व्या वर्षी जपानची Momiji Nishiya ठरली 'सुवर्णकन्या'

ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मधील सर्वात युवा खेळाडू जपानची मोमिजी निशियाने (Momiji Nishiya) अवघ्या 13 व्या वर्षी सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले आहे.

वृत्तसंस्था

ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मधील सर्वात युवा खेळाडू जपानची मोमिजी निशियाने (Momiji Nishiya) अवघ्या 13 व्या वर्षी सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले आहे. दरम्यान, सोमवारचा दिवसही भारतीय खेळाडूंसाठी फारसा चांगला दिवस नव्हता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडूंना फारसे यश मिळाले नाही. जपानची 13 वर्षांची सुवर्ण पदक विजेती मोमिजी निशिया टोकियो 2020 मधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती ठरली आहे. तिने महिला वैयक्तिक स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

ऑलम्पिक 2020 मध्ये स्केटबोर्डिंगमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी मोमिजी प्रथम अ‍ॅथलीट ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच स्केटबोर्डिंगचा समावेश करण्यात आला होता. ब्राझीलच्या रईसा लियनने (13 वर्ष, 203 दिवस) रौप्यपदक पटकावले आहे. वयाच्या 13 व्या वर्षी एवढी मोठी उपलब्धी मिळवणे म्हणजे कौतूकास्पद आहे. मोमिजी निशयाचे संपुर्ण जगातून कौतूक होत आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारत

कमलला वगळता सर्वत्र निराशा आहे. तिरंदाजीत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या तिरंदाजांनी पराभव केला. तलवारबाजीत प्रथम सामना शानदारपणे जिंकल्यानंतर भवानी देवीलाही तिच्या दुसर्‍या सामन्यात पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनमध्येही सात्विक साईराज रॅन्की रेड्डी आणि चिराग शेट्टी इंडोनेशियाच्या फर्नाल्डी गिदोन आणि सुकामुल्जो या जोडीतकडून पराभूत झाले.

पुरुष एकेरीच्या टेनिसमध्ये भारताच्या सुमित नागलचा दुसर्‍या फेरीच्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याच्याकडून 2-6, 1-6 असा पराभव झाला. टेबल टेनिसमधून एक चांगली बातमी आली आहे. अचांत शरथ कमलने पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT