mohammed siraj twitter
क्रीडा

Mohammed Siraj Catch: सिराजने पकडला 'चक्रासन स्टाईल'कॅच! शाकिब अल हसनही झाला शॉक- VIDEO

Ankush Dhavre

पावसामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील ३ दिवस वाया गेले. अखेर चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आणि खेळ पुन्हा सुरू झाला. धावांची शंभरी पार केलेल्या बांगलादेशला चौथ्या दिवशी हवी तशी सुरुवात करता आली नाही.

सुरुवातीच्या एका तासातच बांगलादेशने २ विकेट्स गमावल्या. दर.यान मोहम्मद सिराजने शाकिब अल हसनला बाद करण्यासाठी अविश्वसनीय झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बांगलादेशचा संघ चौथ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. ज्यावेळी बांगलादेशचा संघ मैदानात उतरला त्यावेळी बांगलादेशने ३ गडी बाद १०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर येताच बांगलादेशला २ धक्के बसले. चेंडू आर अश्विनने टाकला. मात्र कौतुक मोहम्मद सिराजचं होतंय. कारण त्याला बाद करण्यासाठी सिराजने अविश्वसनीय झेल घेतला.

तर झाले असे की, बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना भारतीय संघाकडून ५६ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या शाकिब अल हसनने पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच हवेत गेला. मात्र हवा तितका लांब गेला नाही. त्यावेळी मोहम्मद सिराज मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू उंच हवेत गेलेला पाहून, सिराजने मागच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्याने मागच्या दिशेने डाईव्ह मारली आणि झेल घेतला.

सिराजने टिपलेला हा झेल पाहून कोणालाच विश्वास बसत नव्हता. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शाकिब अल हसनलाही विश्वास होत नव्हता. मात्र आपण बाद झालोय हे समजताच तो निराश होऊन माघारी परतला. शाकिबला या डावात अवघ्या ९ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatlh Tips: सांधेदुखीने त्रस्त आहात? घरीच करा हे ५ उपाय, झटक्यात मिळेल आराम

Sunita Williams : सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर पोहोचणार; नासाने काय केली तयारी? पाहा व्हिडिओ

Share Market: तयार राहा! पैसे कमावण्याची जबरदस्त संधी, पुढच्या महिन्यात निघतोय 'या' मोठ्या कंपन्यांचा IPO

BRS Party : महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

Laxman Hake viral video : लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप; पुण्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT