DSP Mohammed Siraj SAAM TV
Sports

DSP Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराज! तेलंगणात पोलीस उपअधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली

Mohammed Siraj Became DSP in Telangana Police : टीम इंडियाचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद सिराजनं तेलंगणात पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

Saam Tv

Mohammad Siraj became DSP : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वीच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. सिराजनं पोलीस उपअधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

सिराजनं स्वीकारला पदभार

मोहम्मद सिराज यानं शुक्रवारी तेलंगणा पोलीस महासंचालकांना रिपोर्ट केल्यानंतर पोलीस उपअधीक्षकपदाचा भार स्वीकारला. यावर्षी जुलैमध्ये तेलंगणा सरकारनं सिराजसह बॉक्सिंगपटू निकहत जरीनचंही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केलं होतं. तसंच ग्रुप १ मध्ये नोकरी देण्याची घोषणा केली होती.

राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने या नियुक्त्यांचा मार्ग अधिक सुकर व्हावा यासाठी तेलंगणा अधिनियमात सुधारणा केली होती.

टीम इंडियानं टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी जूनमध्ये मोहम्मद सिराजला नोकरी देणार असल्याची घोषणा केली होती. वर्ल्डकप विजेत्या संघात सिराज हा तेलंगणाचा एकमेव खेळाडू होता. याआधीही सिराजने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि वनडे वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध फायनलमध्ये सिराजने सहा विकेट घेत भारताला आशिया चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. सिराज सध्या टीम इंडियात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपलं योगदान देत आहे.

सिराजनं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही उत्कृष्ट कामगिरी केली होती. या मालिकेत त्याने ४ विकेट घेतल्या होत्या. भारतानं ही मालिका २-० ने जिंकली. सिराज आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT