Mohammed Siraj Video x (twitter)
Sports

Mohammed Siraj : मनात काहूर, चेहऱ्यावर दडपण, विराटला पाहताच सिराज बॉल टाकायचा थांबला आणि...; इमोशनल Video पाहिलात का?

Mohammed Siraj Virat Kohli : काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजने विराट कोहलीसमोर गोलंदाजी केली. त्या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

RCB VS GT Highlights : चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला गेला. हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला आणि चांगल्या गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराजला प्लेयर ऑफ द मॅच बनला. अवॉर्ड घेताना सिराज काहीसा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी सामन्यात सिराजने विराटसमोर गोलंदाजी केली होती. त्यावेळेसही सिराज भावूक झाला होता.

आरसीबी विरुद्ध जीटी म्हणजेच बंगळुरू विरुद्ध गुजरातच्या सामन्यामध्ये काल विराट कोहली फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराज गोलंदाजी करायला आला. सिराजने धावत रनअप घेतला पण बॉल टाकण्याआधी तो मध्येच थांबला. त्याचा चेहरा पाहून विराटसमोर फलंदाजी करत असल्याने तो भावूक झाल्याचे स्पष्ट झाले होते. या दरम्यानच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेताना मोहम्मद सिराजने मनातील भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, 'मी ७ वर्ष आरसीबीकडून खेळलो होतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी करणे भावनिक होतं. थोडी अस्वस्थता माझ्या मनात होती. पण जेव्हा माझ्या हातात चेंडू आला सगळं बदललं. मी सतत क्रिकेट खेळत होतो. पण माझ्या चुका मला कळत नव्हत्या. ब्रेकदरम्यान मी माझ्या गोलंदाजी आणि फिटनेसवर लक्ष दिलं.'

'मी ज्या वेळेस गुजरातच्या संघात सामील झालो. त्यानंतर मी गोलंदाजीबाबत आशिष नेहराशी चर्चा केली. आता माझ्या गोलंदाजीमध्ये सुधारणा झाली आहे. नेहराने मला खेळाचा आनंद घे आणि तुला जे करायचंय ते कर असं सांगितलं होतं. मी रबाडा, इशांत आणि इतर खेळाडूंशी गोलंदाजीबाबत चर्चा करतो. त्याची मला खरोखर मदत होते', असे वक्तव्य मोहम्मद सिराजने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT