mohammed shami took wicket of mitchell marsh after hitting four runs in ind vs aus 1st odi Twitter
Sports

IND vs AUS: मिचेल मार्शच्या बाऊंड्रीला शमीचं चोख उत्तर, दुसऱ्या मिनिटाला पाठवलं मैदानाबाहेर, VIDEO

Mohammed Shami Bowling: मोहम्मद शमीने भन्नाट गतीने चेंडू टाकत विकेट मिळवली आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Bowling:

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने धमाका केल्याचं पाहायला मिळालं आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आले होते. तर भारतीय संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला.

या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मिचेल मार्शने चौकार मारत शमीवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील चेंडू निर्धाव गेला अन् चौथ्या चेंडूवर शमीने त्याची विकेट मिळावली.

शमीने ओव्हर द विकेटचा मारा करत अचूक टप्प्यावर चेंडू टाकला जो टप्पा पडताच फिरला आणि बॅटची कडा घेत थेट स्लिपमध्ये असलेल्या शुबमन गिलच्या हातात गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Latest sports upates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार,यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरुन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

SCROLL FOR NEXT