IPL ऑक्शनआधीच खेळाडूंच्या ट्रेडिंग जोरदार चर्चा सुरु आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याबाबत मोठी बातमी समोर आलीये. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शमीच्या ट्रेडवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या करारानुसार, शमी राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात येण्याची शक्यता आहे. तर इंग्लंडचा ऑल राऊंडर खेळाडू सॅम करन लखनऊ सुपर जायंट्सच्या टीममध्ये येणार आहे. याशिवाय तामिळनाडूचा डावखुरा फिरकी गोलंदाज एम. सिद्धार्थ याचाही या ट्रेडमध्ये समावेश आहे.
ESPNcricinfo च्या माहितीनुसार, लखनऊ आणि राजस्थान या दोन्ही टीम्समध्ये या ट्रेडबाबत सहमती झालीये. या व्यवहारानुसार, मोहम्मद शमी राजस्थानच्या टीममध्ये जाणार आहे. तर सॅम करन लखनऊच्या टीममध्ये सामील होणार आहे. पण अजून या ट्रेडची अधिकृत प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
मोहम्मद शमीने अलीकडेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. सप्टेंबरमध्ये शमी 36 वर्षांचा झाला. IPL 2026 मध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नव्हती. त्याने 13 सामन्यांत 9.00 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या अनुभवामुळे लखनऊच्या गोलंदाजीला ताकद मिळाली होती. पण त्या सिझनमध्ये लखनऊची टीम पॉईंट्स टेबलच्या शेवटच्या स्थानावर राहिली होती.
शमीने T20 क्रिकेटमध्ये अनेकदा त्यांच्या गोलंदाजीने सामन्याचं चित्र बदललंय. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये म्हणजेच पॉवरप्लेमध्ये तो चांगली गोलंदाजी करतो. 2024 पासून आतापर्यंत त्याने पॉवरप्लेमध्ये 8.76 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
IPL 2026 मध्ये लखनऊच्या टीमने पॉवरप्लेमध्ये 8.71 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली होती. या बाबतीत लखनऊ सर्व टीम्समध्ये आघाडीवर होता. आता शमी राजस्थानमध्ये गेल्यास त्याची जोडी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसोबत जमू शकते. गेल्या सिझनमध्ये आर्चर हा राजस्थानच्या टीममधील प्रमुख गोलंदाज होता. त्यामुळे शमी आणि आर्चर या दोघांच्या अनुभवाचा राजस्थानला फायदा होऊ शकतो. त्यांच्या येण्याने राजस्थानच्या गोलंदाजीमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू सॅम करन आता लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसू शकतो. IPL मधील त्याची ही तिसरी फ्रेंचायझी असेल. याआधी तो पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमकडून खेळलाय. दरम्यान दुखापतीमुळे सॅम करनला IPL 2026 मध्ये खेळता आलं नव्हतं. आता लखनऊच्या टीममध्ये गेल्यानंतर टीमचे ग्लोबल डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मूडी यांच्यासोबत स्ट्रॅटेजी बनवेल. करन आणि मूडी यांनी याआधीही वेगवेगळ्या लीगमध्ये एकत्र काम केलं आहे.
द हंड्रेड स्पर्धेत दोघंही ओव्हल इनव्हिन्सिबल्स टीमसोबत होतं. तसंच UAE मधील ILT20 लीगमध्ये त्यांनी डेझर्ट वायपर्स टीमसाठीही एकत्र काम केलंय आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये टॉम मूडी यांच्या मार्गदर्शनाखाली सॅम करनने डेझर्ट वायपर्सला ILT20 स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिलं होतं.
त्यामुळे आता सॅम करनच्या येण्याने लखनऊच्या टीमला ऑलराऊंडर खेळाडूची कमतरता भासणार नाही. पण शमी, करन आणि एम. सिद्धार्थ यांच्या ट्रेडची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या बदलांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.