mohammed shami twitter
Sports

Mohammed Shami: अखेर शमीला संघात स्थान मिळालं! या दिवशी उतरणार मैदानात

Mohammed Shami,Sayyed Mushtaq Ali Trophy: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami News In Marathi: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अखेर दुखापतीतून सावरून त्याने मैदानात कमबॅक केलं आहे. त्याने रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत ७ गडी बाद केले.

या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बंगाल संघात स्थान देण्यात आलं आहे. शमीकडे आपली फिटनेस सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली होती. मात्र या स्पर्धनंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर पडावं लागलं. त्यानंतर वर्षभर तो क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करु शकला नव्हता.

त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याने रिहॅब करत आपली फिटनेस पुन्हा मिळवली. त्याला मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली. शमी हा संघातील प्रमुख गोलंदाज आहे.

त्यामुळे त्याला महत्वाच्या सामन्यांसाठी राखून ठेवणं हे बीसीसीआयसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे बीसीसीआय कुठलीही रिस्क घेणार नाहीये.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची मेडिकल टीम आणि टीम मॅनेजमेंटला वाटतंय की, शमीने आणखी काही सामने खेळावे. त्यामुळे त्याचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सुदीप कुमार घरामीकडे संघाची घूरा सोपवण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे बंगालचा संघ:

सुदीप कुमार घरामी (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, करण लाल, रितिक चॅटर्जी, रित्विक रॉय चौधरी, शाकिर हबीब गांधी (यष्टीरक्षक), रणजोत सिंग खैरा, प्रयास रे बर्मन, अग्निव पान (यष्टीरक्षक), प्रदीप्ता प्रमाणिक, सक्षम चौधरी, मोहम्मद शमी, ईशान पोरेल, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जयस्वाल, सायन घोष, कनिष्क सेठ आणि सौम्यदीप मंडल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT