Mohammed shami news Saam tv
Sports

IND vs PAK : मोहम्मद शमीला झालंय तरी काय? पहिल्याच षटकात टाकले ११ बॉल, नेमकं काय घडलं?

IND vs PAK News : आजच्या सामन्यात मोहम्मद शमी दिशाहीन झाल्याचं पाहायला मिळाला. त्याने एकाच षटकात ११ चेंडू टाकले. मात्र, त्याने ओव्हरमध्ये ६ धावा दिल्या.

Vishal Gangurde

दुबईतील स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान जंगी सामना सुरु आहे. दुबईमधील सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गोलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मोहम्मद शमी दिशाहीन झाल्याचा पाहायला मिळाला. मोहम्मद शमीला दिशाहीन गोलंदाजी करत पहिल्याच षटकात ११ चेंडू टाकले.

शमीची दिशाहीन गोलंदाजी

रोहित शर्माने पहिली ओव्हर मोहम्मद शमीला दिली. राोहितने मोठ्या आशेने मोहम्मद शमीला षटक दिलं होतं. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने ५ व्हाईट बॉल टाकले. पहिल्या ओव्हरमध्ये शमीने ६ धावा दिल्या. त्यात अतिरिक्त ५ धावांचा समावेश आहे.

दरम्यान, मोहम्मद शमीचं पाकिस्तानविरोधात भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मोहम्मद शमी १० वर्षानंतर पाकिस्तानविरोधात खेळत आहे. या आधी शमीने २०१५ साली पाकिस्तानविरोधात खेळला होता. त्याने पाकिस्तानविरोधात ३ सामने खेळले आहेत. त्याने त्यांच्याविरोधात एकूण ५ गडी बाद केले आहेत. त्याने २१.४० सरासरीने विकेट घेतले आहेत. शमीने पाकिस्तानविरोधातील एका सामन्यात ३५ धावा देऊन चार गडी बाद केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात संधी मिळाल्यानंतर शमी काय जादू करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भारताची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, केएल राहुल, अक्षर पटेल, हर्षित राणा, मोहम्मद शामी, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर

पाकिस्तानची प्लेईंग ११

इमाम उल हक, बाबर आझम, (कर्णधार), शाहीन शाह आफ्रिदी, सौद शकील, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, हॅरीस रौफ, अबरार मोहम्मद, तय्यब ताहीर, सलमान अगा, खुशदील शाह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT