mohamme shami twitter
क्रीडा

Mohammed Shami: कमबॅक असावं तर असं.. 360 दिवसांनंतर मैदानात उतरला अन् पहिल्याच सामन्यात राडा केला

Mohammed Shami Comeback: वर्षभरानंतर मैदानात परतलेल्या मोहम्मद शमीने पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami News In Marathi: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्षभरानंतर मैदानात परतला. कमबॅक करताच पहिल्याच सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत ७ गडी बाद केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

गेली काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर त्याला मध्यप्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळाली. बंगालकडून खेळताना त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले.

बंगाल आणि मध्य प्रदेश यांच्यातील ग्रुप सी चा सामना इंदुरच्या होळकर स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात शमीने १९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ४ निर्धाव षटकं टाकत ५४ धावा खर्च केल्या आणि ४ गडी बाद केले.

पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात त्याच्याकडून ऑलराऊंड कामगिरी पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने २४.२ षटक गोलंदाजी केली यादरम्यान १०२ धावा खर्च करत त्याने ३ गडी बाद केले. दरम्यान फलंदाजी करताना त्याने ३६ चेंडूत ३७ धावांची खेळी केली.

वर्षभरानंतर मैदानावर कमबॅक

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती. सुरुवातीचे सामन्यांमध्ये त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं.

त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालं आणि त्याने या संधीचं सोनं केलं. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर तो मैदानात कमबॅक करु शकला नव्हता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत .मात्र शमीची ही कामगिरी पाहिल्यानंतर त्याला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

असे झाल्यास शेवटच्या २ किंवा ३ कसोटी सामन्यांसाठी शमीचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. कारण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्यासाठी बुमराहच्या जोडीला शमीसारखा अनुभवी गोलंदाज असणं खूप गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

Maharashtra News Live Updates: येवला तालुक्यातील पाटोदामध्ये भुजबळ-जरांगे पाटील समोरासमोर येणं टळलं

SCROLL FOR NEXT