team india
team india Saam Tv
क्रीडा | IPL

Hasin Jahan On Mohammed Shami: 'हॉटेलमध्ये मुलींसोबत...' टीम इंडियाच्या खेळाडूच्या अडचणीत वाढ, बायकोने केले गंभीर आरोप

Ankush Dhavre

Mohammed Shami Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने जोरदार कामगिरी केली आहे. सध्या तो मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अनेकदा आपली पत्नी हसीन जहाँमुळे चर्चेत आला आहे. या दोघांमध्ये सुरु असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. आता हसीन जहाँने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

तिने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप हसीन जहाँने केला आहे.

यापूर्वी देखील केला आहे आरोप..

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ हे दोघेही २०१४ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. विवाह होऊन ४ वर्ष झाल्यानंतर तिने शमी कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान जानेवारी २०२३ मध्ये कोलकाता हाय कोर्टाने हसीन जहाँला दरमहा ५०,००० रुपये देण्याचे आदेश देखील दिले होते.

शमी आणि हसीन जहाँ यांची कायदेशीर लढाई गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या काळात मोहम्मद शमीला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला आहे. हसीन जहाँला मोहम्मद शमीकडून दरमहा १० लाख रुपये भरपाई म्हणून हवे होते. मात्र कोर्टाने केवळ ५०,००० रुपयांची मंजुरी दिली होती. (Latest sports updates)

हसीन जहाँने केलेले आरोप..

हसीन जहाँने मोहम्मद शमीवर हुंडा मागण्याचा,देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. तिचं असं म्हणणं आहे की, बीसीसीआयने दिलेल्या रूममध्ये तो हे सर्व कामं करायचा असे गंभीर आरोप हसीन जहाँने केले आहे. इतकंच नव्हे तर तो अजूनही अशी कामं करतो, यासाठी तो दुसऱ्या मोबाईलचा वापर करतो, असं हसीन जहाँचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT