mohammed rizwan saam tv
Sports

Mohammed Rizwan: हे भारी जमलंय..पाकिस्तानच्या पराभवानंतर रिझवानने कोणाला केलं टार्गेट?

Mohammed Rizwan On Defeat: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र या स्पर्धेत या संघाचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा पाकिस्तान संघासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. तब्बल २९ वर्ष वाट पाहिल्यानंतर पाकिस्तानला आयसीसीची स्पर्धा होस्ट करण्याची संधी मिळाली होती. मात्र यजमान संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानला या स्पर्धेत ३ सामने खेळण्याची संधी मिळाली.

यापैकी २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. तर १ सामना पावसामुळे धुतला गेला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या स्पर्धेत पाकिस्तानला दुखापतींचा फटकाही बसला. सॅम अयूब आणि फखर जमान यांना दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. त्यामुळे संतुलित प्लेइंग ११ बनवता आली नाही, असं कर्णधार मोहम्मद रिझवान म्हणाला. तसेच संघाच्या एकूण कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला, 'आम्हाला चांगली कामगिरी करायची होती. आमच्या देशातील फॅन्ससमोर आम्हाला चांगली कामगिरी करुन दाखवायची होती. आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नाही. हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. '

गेल्या वर्षी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघाना पराभूत करण्यात अयूबने मोलाची भूमिका बजावली होती. सॅम अयूबबाबत बोलताना, तो म्हणाला,' जो खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेत दमदार कामगिरी करत होता. तो खेळाडू अचानक दुखापतीमुळे संघाबाहेर गेला, तर संघ फुटतो. त्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ होते. मात्र मी कुठलंही कारण देणार नाही.आम्ही यातून नक्कीच शिकू.'

भारत- न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

या स्पर्धेतील ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे ४ संघ होते. या ४ पैकी बांगलादेश आणि पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT