कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बंगालचा मित्रबा गुहा जेतेपदाचा मानकरी ठरला आहे. मित्रबा गुहाने सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली आणि जेतेपदावर नाव कोरलं.
आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कल्याणमधील नवरंग बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील ६५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यात कल्याण- डोंबिवली परिसरातील २०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेचे नियोजन कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेमार्फत करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांबद्दल बोलायचं झालं तर, पश्चिम बंगालच्या मित्रूा गुहाने ९ गुणांची कमाई करत अव्वल क्रमांक पटकावला. तर चेन्नई आयसीएफच्या लक्ष्मण आर.आर यांनी ८ गुणांची कमाई करत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस पटकावलं. यासह पश्चिम बंगालचा बुद्धिबळपटू कौस्तूव कुंडुने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. (sports news in marathi)
स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसह खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आमदार आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेली अशी एकमेव बुद्धीबळ स्पर्धा ठरली ज्यामध्ये एकाच वेळी देशातील १७ ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर खेळाडूंनी सहभाग घेतला. ५ वर्षांच्या चिमुरड्यापासून ते ७६ वर्षांच्या वयोवृद्ध खेळाडूंनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला असल्याची माहिती कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेने दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.