मिताली राज Twitter/ @ICC
Sports

मिताली राज ने नोंदवला नवा विश्वविक्रम

कर्णधार मिताली राजच्या तिसर्‍या सलग अर्धशतकामुळे शनिवारी तिसर्‍या वनडे सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडविरुद्ध विजय नोंदविला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्णधार मिताली राजच्या (Mithali Raj) तिसर्‍या सलग अर्धशतकामुळे शनिवारी तिसर्‍या वनडे सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) विजय नोंदविला. भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेरच्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडला चार विकेट्सने पराभूत केले. तथापि, हा पराभव झालेला असुनही इंग्लंडने मालिका २-१ अशी जिंकली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने यजमानांनी जिंकले होते.

पावसामुळे सामना 47 षटकांचा झाला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी 219 धावा केल्या. स्किव्हरने त्यांच्यासाठी सर्वाधिक 49 धावा केल्या तर कर्णधार हेदर नाइटने 46 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने 47 धावा देऊन तीन बळी घेतले. इंग्लंडच्या संघाला आपल्या शानदार गोलंदाजी समोर नमवले.

मितालीचा नवा विश्वविक्रम

भारतीय कर्णधार मिताली राज महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्डला मागे टाकले आहे. 38 वर्षीय मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 10337 धावा झाल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 10273 धावा काढण्याचा विक्रम एडवर्डच्या नावावर आहे. या यादीमध्ये न्यूझीलंडची सुझी बेट्स 7849 धावाांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे यश गाठण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागू शकतात.

दरम्यान सामन्यात विजय नोंदवण्यासाठी भारतीय संघाला शेवटच्या षटकापर्यंत कठोर परिश्रम करावे लागले. 47 षटकांचा हा सामना भारताने 46.3 षटकांत 6 गडी गमावून 220 धावा करुन जिंकला. कर्णधार मिताली राजने 86 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा केल्या. शिवाय स्मृती मंधानानेही 49 धावांची खेळी केली. अष्टपैलू स्नेह राणाने 24 महत्त्वपूर्ण धावा केल्या. दीप्ती शर्माच्या 18 धावा केल्या.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT