r ashwin twitter
Sports

IND vs AUS: विकेट फेकली! Out नसतानाही मार्श गेला मैदानाबाहेर; अश्विनही झाला शॉक,नेमकं काय घडलं?

Mitchell Marsh Wicket: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मिचेल मार्श बाद नसतानाही मैदानाबाहेर गेला.

Ankush Dhavre

अॅडिलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना १८० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली आहे.

मार्शने विकेट फेकली

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रेविस हेड चांगलाच सेट झाला होता. त्याला मिचेल मार्शने चांगली साथ दिली. मात्र मिचेल मार्श विकेट फेकून माघारी परतला. मिचेल मार्श २६ चेंडूंचा सामना करुन ९ धावा करुन माघारी परतला.

मिचेल मार्श या डावात आऊट नव्हताच, मात्र त्याने स्वत:च पॅव्हेलियनची वाट धरली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, ६४ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू अश्विनने भारीच टाकला. टप्पा पडताच हा चेंडू थोडा फिरला आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला.

मार्शने हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला शॉट खेळण्यास थोडा उशीर झाला. चेंडू हातात जाताच रिषभ पंतने अपील केली, अश्विन अपील करण्यासाठी मागे वळणार, इतक्यात मार्शने पॅव्हेलियनची वाट धरली.

मार्श स्वत: जायला निघाला, त्यामुळे अंपायरनेही त्याला बाद घोषित केलं. जेव्हा अंपायरने त्याला बाद घोषित केलं, त्यावेळी अश्विनलाही धक्का बसला. अश्विनची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.

ज्यावेळी स्निको मीटरमध्ये पाहिलं गेलं, त्यावेळी बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क न झाल्याचं दिसून आलं. अश्विनलाही माहित होतं की, चेंडू त्याच्या बॅटला लागून गेलेला नाही. त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केल्यानंतर, अश्विनने शॉकिंग रिअॅक्शन दिली. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर, नक्कीच त्याला पश्चाताप झाला असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT