'या' खेळाडूने बांधली स्वत:च्याच बहिणीशी लग्नगाठ Saam Tv
Sports

'या' खेळाडूने बांधली स्वत:च्याच बहिणीशी लग्नगाठ

एका पोर्तुगीज मोटरसायकल रेसरने उघड केले आहे की त्याने त्याच्या सावत्र बहिणीशी लग्न केले आहे.

वृत्तसंस्था

एका पोर्तुगीज मोटरसायकल रेसरने उघड केले आहे की त्याने त्याच्या सावत्र बहिणीशी लग्न केले आहे. लवकरच त्याची बहीण त्यांच्या पहिल्या मुलाला देखील जन्म देणार आहे. मोटोजीपी (MOTOGP) रायडर मिगुएल ऑलिवेरा (Miguel Oliveira) ज्याचे वय 26 वर्षे आहे. त्याने 25 वर्षीय मैत्रीण आंद्रेया पिमेंटाशी लग्न केले आहे, जी नातेसंबंधाने त्याची बहीण आहे. त्यांनी त्यांचे नाते 11 वर्षे गुप्त ठेवले होते. दोघे वयाच्या 13 व्या वर्षापासून एकमेकांना ओळखत आहेत. दोघांची ओळख मिगुएलच्या वडिलांनी करुण दिली होती. जेव्हा त्यांनी मिगुएलच्या आईशी लग्न केले होते. काही दिवसांनी त्यांची मैत्री वाढली. वर्ष 2019 मध्ये दोघांनीही त्यांचे नाते सार्वजनिक केले. दरम्यान, दोघांनीही त्यांचे नाते 11 वर्षे गुप्त ठेवले होते.

जुलैमध्ये त्यांच्या लग्नाच्या दिवसांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत मिगुएलने लिहिले, ''या वीकेंडला आम्ही आमच्या आयुष्याच्या वळणावर पोहोचलो आहोत. आम्ही लग्नाद्वारे आमच्या प्रेमाला नात्यामध्ये रुपांतरीत केले आहे आणि आम्हाला ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. मी माझ्या पत्नीसोबत माझे आयुष्य घालवण्यात आनंदी आणि भाग्यवान आहे. ती माझे सर्वस्व आहे. तुम्हा सर्वांचे आभार''.

मिगुएल ऑलिव्हिरा आपल्या बहिणीशी असलेल्या नात्याबद्दल म्हणाला, 'प्रेमापूर्वी आम्ही खूप चांगले मित्र होतो. आम्ही एकत्र वाढलो. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आमच्यामध्ये खूप मजबूत प्रेम आहे. आम्ही आधीच लग्न करणार होतो. पण माझी एक शर्यत होती त्यामुळे आम्हाला ती पुढे ढकलावी लागली होती. मिगुएलचे वडील पाउलो यांनी बातमी उघड केली की त्यांच्या मुलाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची दुसरी पत्नी क्रिस्टीना यांच्या मुलीशी लग्न केले. स्पॅनिश क्रीडा वृत्तपत्र मार्काशी बोलताना तो म्हणाला, 'मला आनंद आहे की माझ्या मुलाचे लग्न त्याने निवडलेल्या मुलीशी होत आहे''.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT