आयपीएल २०२४ स्पर्धेतील १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यानही हार्दिक पंड्याच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. दरम्यान मुंबई इंडियन्स संघात दोन गट पडले आहेत, अशा चर्चा सुरु आहेत. खरंच मुंबई इंडियन्स संघ २ गटांमध्ये विभागला गेला आहे का? याबाबत मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने मोठं वक्तव्य केलं आहे.
राजस्थानविरुद्धचा सामना झाल्यानंतर आकाश मधवालने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला.या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की,'संघातील वातावरण खरंच चांगलं आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दोघेही मदत करतात. सराव सामन्यादरम्यान मी हार्दिक भाई आणि रोहित भाईसोबत चर्चा केली. बुमराह भाई देखील मदत करतात. आम्ही येणाऱ्या सामन्यांमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करु.'
तसेच खेळपट्टी आणि प्लानिंगबाबत बोलताना तो म्हणाला की, ' खेळपट्टी पाहून आम्ही स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही जो प्लान केला होता त्याचप्रमाणे गोलंदाजी केली. खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर होती.'
या सामन्यात आकाश मधवाल मुंबई इंडियन्स संघाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना २० धावा खर्च करत ३ गडी बाद केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकअखेर ९ गडी बाद १२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून रियान परागने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.