MI VS RCB Highlights x
Sports

MI VS RCB Highlights : हार्दिक-तिलकची झुंज व्यर्थ, हेजलवूड-कृणालने सामना फिरवला, मुंबईचा चौथा पराभव

MI VS RCB IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय झाला आहे. घरच्या स्टेडियमवर आरसीबीने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला आहे.

Yash Shirke

MI VS RCB Match Highlights : वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महामुकाबल्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय झाला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये मुंबईला हार पत्करावी लागली आहे. आयपीएल २०२५ मधला हा मुंबईचा चौथा पराभव झाला. दहा वर्षांपासून बंगळुरूने मुंबईचा वानखेडेवर पराभव केला नव्हता. तो रेकॉर्ड आज आरसीबीने मोडीत काढला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा महामुकाबला वानखेडे स्टेडियमवर रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २२१ धावा केल्या. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकीय खेळी केली. जितेश शर्माने देखील तुफान फटकेबाजी केली. २० ओव्हर्समध्ये आरसीबीने धावांचा डोंगर रचला.

दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सची सुरुवात वाईट ठरली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन दोघांनी प्रत्येकी १७ धावा केल्या. विल जॅक्स २२ तर सूर्यकुमार यादवने २८ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने तिलक वर्माच्या साथीने खेळ सावरला. पुढे ५६ धावा करुन तिलक वर्मा माघारी परतला. फटकेबाजी करताना चुकीच्या शॉटवर पंड्या बाद झाला. त्याने १५ बॉल्सवर ४२ धावा केल्या. मिचेल सँटनर आणि नमन धीरने सामना जिंकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण मुंबईच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -

विल जॅक्स, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची प्लेईंग 11 -

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT