MI vs RCB, IPL 2023 Match Updates Saam TV
Sports

MI vs RCB IPL 2023 Match : विराट, फाफ डू प्लेसिसची वादळी खेळी; आरसीबीचा मुंबईवर मोठा विजय

MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला ८ विकेट्स आणि २२ चेंडू राखत पराभवाची धूळ चारली.

Satish Daud

MI vs RCB, IPL 2023 Match : विराट कोहलीच्या ४९ चेंडूत नाबाद ८२ धावा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४३ चेंडूत केलेल्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला ८ विकेट्स आणि २२ चेंडू राखत पराभवाची धूळ चारली. या पराभवासह मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातील पहिला सामना गमावण्याच्या आपला खराब रेकॉर्ड कायम ठेवला. (Latest sports updates)

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आरसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली.

पावरप्ले सुरू असताना इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मधल्या फळीचे फलंदाज टीम डेव्हिड, ऋतिक शौकीन मुंबईला तारेल असं वाटत होतं. मात्र त्यांनाही धावांचा सूर गवसला नाही. (Cricket News)

मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून करन शर्माने २ गड्यांना बाद केलं. याशिवाय मोहमद सिराज, टॉल्फी, आकाश दीप, हर्षल पटेल, मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवले.

१७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला उतरले दोघांनी मिळून मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलीच पिसे काढली. मुंबईचे वेगवान गोलंदाज जेसन बेहनड्रॉफ, जोप्रा आर्चर या दोघांना कोहली डू प्लेसिसच्या जोडीने सळो की पळो करून सोडलं.

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस मुंबईच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडले. दोघांनी घरेलू मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्साठी ८९ चेंडून १४८ धावांची भागीदारी झाली. फाफ डू प्लेसिस ४३ चेंडूत केलेल्या ७३ धावा काढून बाद झाला.

फाफ डू प्लेसिसनंतर विराट कोहलीने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. कोहलीने षटकार १७ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीने षटकार ठोकत आरसीबीला विजय मिळवून दिला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपलं खातं उघडलं असून मुंबईला पुन्हा एकदा सलामीच्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडा पाव मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

Maharashtra Rain Live News: सांगलीतील चांदोली धरण 93 टक्के भरले, धरणातून 11 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

SCROLL FOR NEXT