mi vs rcb faf du plessis statement after defeat against mumbai indians amd2000
mi vs rcb faf du plessis statement after defeat against mumbai indians amd2000 twitter
क्रीडा | IPL

Faf Du Plessis Statement: आरसीबीचा संघ नेमका कुठे मागे पडतोय? पराभवानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं खरं कारण

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार खेळ करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पाचव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस नाराज असल्याचं दिसून आलं आहे.

या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने मान्य केलं की, संघाची गोलंदाजी कमकुवत आहे. त्यामुळे आता फलंदाजांना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. असं फाफ डू प्लेसिस म्हणाला.

'गोलंदाजीच्या बाबतीत आम्ही सुरुवातीपासूनच संथ होतो. आम्हाला पावरप्लेच्या षटकांमध्ये विरोधी संघातील कमीत कमी २ फलंदाजांना बाद करण्यासाठी रणनीती आखावी लागेल. त्यामुळे आम्हाला वाटेल की, आम्ही गोलंदाजीत चांगली सुरुवात केलीय. मला गेल्या काही सामन्यांपासून हेच वाटतंय की, आम्ही सुरुवातीच्या काही षटकांनंतरच बॅकफुटवर जातोय.' असं फाफ डू प्लेसिस म्हणाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने सहज विजय मिळवला. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'आता असं वाटू लागलं आहे की, आम्हाला फलंदाजीत २५० पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील. तेव्हा कुठे आम्हाला जिंकण्याची संधी मिळेल. त्यामुळे आता सर्व फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यांनी आपल्या फॉर्मचा आणि आत्मविश्वासाचा वापर करावा. आम्ही जितक्या जास्त धावा करू तितकीच स्पर्धेत टिकून राहण्याची शक्यता वाढेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : जून महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Rashi Bhavishya : जूनच्या पहिल्याच दिवशी 'या' राशींना मिळणार गोड बातमी; तुमची रास यात आहे का? वाचा राशी भविष्य

5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?

Maharashtra Politics: लोकसभेनंतर भाजप अॅक्शन मोडवर, आमदारांच्या कामगिरीचं पोस्टमार्टम होणार

SCROLL FOR NEXT