MI VS LSG Rohit Sharma X
Sports

Rohit Sharma : उन्हात ना बॅटिंग, ना फिल्डिंग; रोहित शर्माची फक्त दोन सिक्सची डील, सोशल मीडिया मीम्स व्हायरल

MI VS LSG : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माने दोन षटकार मारत फक्त १२ धावा केल्या. त्याच्या विकेटनंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले.

Yash Shirke

IPL 2025 मधील ४५ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगला आहे. सामन्यामध्ये लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी २० ओव्हर्समध्ये २१५ धावा केल्या. सलामीसाठी आलेल्या रायन रिकेल्टनने अर्धशतकीय खेळी केली. पण रोहित शर्मा फक्त १२ धावा करुन माघारी परतला.

रोहित शर्मा आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला खराब फॉर्ममध्ये होता. पण चेन्नईच्या सामन्यानंतर त्याला सूर गवसला. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने नाबाद ७६ धावा केल्या होत्या. हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यातही त्याने ७० धावा केल्या. पण आजच्या (२७ एप्रिल) सामन्यात रोहित दोन षटकार मारत आउट झाला. रोहित शर्मा कॅचआउट झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. एका मीम पोस्टमध्ये मुंबईच्या उन्हामध्ये बॅटिंग करायची नाही, इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे फिल्डिंग करायची नाही. फक्त सिक्स मारायचे असे म्हटले होते.

मुंबई इंडियन्सकडून रायन रिकेल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावत चमकदार खेळी केली. त्यांना साथ देताना विल जॅक्सने २९ धावा, नमन धीरने नाबाद २५ धावा आणि कॉर्बिन बॉशने २० धावा जोडल्या. लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांमध्ये मयंक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

२१६ धावांचे लक्ष लखनऊ सुपर जायंट्सला गाठता आले नाही. लखनऊच्या शिलेदारांनी फक्त १६१ धावा केल्या. आयुष बडोनीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. मिचेल मार्श ३४ धावांवर, मायक्रन ९ धावांवर तर निकोलस पूरन २७ धावांवर बाद झाला. विल जॅक्सच्या ओव्हरमध्ये पूरननंतर रिषभ पंत बाद झाला. डेव्हिस मिलर आणि आयुष बडोनीने लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT