MI Vs GT Eliminator X
Sports

MI Vs GT : रोहित शर्माची झंझावाती खेळी, मुंबईने रचला धावांचा डोंगर; गुजरातसमोर लक्ष्य कितीचं?

MI Vs GT Eliminator : आयपीएल २०२५ मधील एलिमिनेटर सामना मुल्लानपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. २० ओव्हर्समध्ये मुंबईचा डाव २०० पार गेल्याचे पाहायला मिळाले.

Yash Shirke

IPL 2025 मधील एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगला आहे. क्वालिफायर २ मध्ये जाण्याच्या लढाईसाठी दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० ओव्हर्समध्ये २२८ धावा केल्या आहेत. आता एलिमिनेटर सामना जिंकण्यासाठी गुजरातसमोर २२९ धावांचे लक्ष्य आहे.

एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर ठरला. मुंबईच्या फलंदाजांनी सामन्यात चांगला खेळ केला. त्यातही खास करुन सलामीसाठी आलेल्या रोहित शर्माने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली.

जॉनी बेअरस्टो झटपट २२ चेंडूत ४७ धावा करुन माघारी परतला. बेअरस्टो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने २० चेंडूत ३३ धावा केल्या. तिलक वर्माने रोहितला चांगली साथ दिली. रोहित शर्माने ५० चेंडूमध्ये ८१ धावा केल्या. या खेळीदरम्यान रोहित शर्माने अनोखा इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात तब्बल ३०० षटकार मारणारा रोहित पहिला खेळाडू बनला. रोहित कॅचआउट झाल्यानंतर मागच्या बाजूला शॉट मारण्याचा नादात तिलक वर्मा बाद झाला. तिलक ११ चेंडूत २५ धावा करुन डगआउटमध्ये गेला. नमन धीर ९ धावांवर बाद झाला.

दुसऱ्या बाजूला गुजरातकडून साई किशोरने मुंबईला पहिले दोन धक्के दिले. इन फॉर्म रोहितला शतक करण्यापासून प्रसिद्ध कृष्णाने रोखले. राशिद खानला तिलक वर्माची विकेट मिळाली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाला तिसरी विकेट मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये गुजरातने फारशी चांगली गोलंदाजी केली नाही. त्यातही क्षेत्ररक्षणात त्यांनी सर्वात जास्त माती खाल्ली. गुजरातच्या अनेक खेळाडूंनी अनेक कॅचेस सोडल्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांना गुजरातच्या खराब फिल्डींगमुळे जीवनदान देखील मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT