MI vs DC Playing XI prediction Mumbai Indians vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000 twitter
Sports

MI vs DC, Playing XI: सूर्यकुमार यादवच्या कमबॅकनंतर मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११ बदलणार! संघात ४ बदल निश्चित

Mumbai Indians vs Delhi Capitals, Playing XI Prediction: चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

Ankush Dhavre

MI vs DC, Playing XI Prediction:

मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत नावाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. आता चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मुख्य बाब म्हणजे संघातील हुकमी एक्का सूर्यकुमार यादव या सामन्यातून कमबॅक करणार आहे. दरम्यान सूर्यकुमार यादव आल्यानंतर प्लेइंग ११ मध्ये काय बदल होणार? कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

सूर्याला कोणाच्या जागी संधी मिळणार?

गेले काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला सूर्यकुमार यादव अखेर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचं कमबॅक हे आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असणार आहे. सूर्यकुमार यादवचं कमबॅक झाल्यानंतर नमन धीरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यापूर्वी झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकांवर फलंदाजीसाठी आला आहे. यासह डेवाल्ड ब्रेविसऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नेहाल वढेराला संधी दिली जाऊ शकते. तसेच गोलंदाजीत मफकाच्या जागी नुवान तुषाराला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. (Cricket news in marathi)

सूर्याच्या कमबॅकनंतर अशी असेल मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११...

रोहित शर्मा, इशान किशन ( यष्टिरक्षक) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या ( कर्णधार), टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्जी, पियूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा

मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून आणि तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाच्या सरी; नवी मुंबईसह ठाणे, डोंबिवलीत पाऊस

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

SCROLL FOR NEXT