Ravindra Jadeja Catch Video : मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रंगतदार सामना सुरू आहे. या हायव्होल्टेज सामन्यात चेन्नईने प्रथम टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या. (Latest sports updates)
पावरप्ले वगळता चेन्नईच्या गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात (IPL 2023) चांगली गोलंदाजी केली. याशिवाय चेन्नईच्या खेळाडूंनी चांगले क्षेत्ररक्षणही केले. दरम्यान चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने स्वतः टाकलेल्या बॉलवर घेतलेला सनसनाटी कॅच पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रविंद्र जडेजाच्या मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने मोठा फटका मारला. त्यानंतर चेंडू थेट गोळीसारखा अंपारच्या दिशेने आला. त्याचदरम्यान जडेजाने तातडीनं अप्रतिम क्षेत्ररक्षण करत झेल पकडला. जर जडेजाने हा वेगवान चेंडू पकडला नसता, तर समोर असलेल्या अंपायरला चेंडू लागण्याची दाट शक्यता होती. मात्र, जडेजाने हा अप्रतिम झेल पकडला.
दरम्यान, जडेजाने घेतलेल्या या कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत रवींद्र जडेजाचं कौतुक केलं आहे. या कॅचवरून मुंबई आणि चेन्नईच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. याबाबतचे मिम्स देखील जोरदार व्हायरल झाले आहेत.
चेन्नईच्या गोलंदाजांसमोर मुंबईची शरणागती या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. परंतु त्यानंतर दोघांच्या एकामागोमाग एक विकेट पडल्या आणि संघाचा डाव गडगडला. यानंतर कोणत्याही खेळाडून ख्रिजवज जास्त वेळ पाय रोऊन उभे राहता आले नाही.
मुंबईने निर्धारित 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या आहेत. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 32 आणि टिम टेव्हिडने 31 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. चेन्नईसमोर आता विजयासाठी 158 धावांचे लक्ष आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.