MI vs CSK IPL Playing XI prediction mumbai indians vs chennai super kings playing 11 prediction amd2000 twitter
Sports

MI vs CSK,Playing XI: आज मुंबई - चेन्नई भिडणार! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

Mumbai Indians vs Chennai Super Kings Playing XI News: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात २ संघ आमने सामने येणार आहेत. पहिला सामना कोलकता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत ५-५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई आणि चेन्नईच्या सामन्यात रोहित आणि धोनी कर्णधार नसणार आहेत. मुंबईकडून हार्दिक पंड्या संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर या संघाने दमदार कमबॅक केलं आणि सलग २ सामने जिंकले. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघ देखील शानदार कामगिरी करतोय. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११...

मुंबई इंडियन्स संघाची संभावित प्लेइंग ११: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी, आकाश मधवाल.

अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची संभावित प्लेइंग ११: ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार ), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, समीर रिजवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT