mi vs csk ipl 2024 match report chennai super kings beat mumbai indians by 20 runs amd2000 twitter
क्रीडा

MI vs CSK, IPL 2024: हिटमॅनची शतकी खेळी व्यर्थ! घरच्या मैदानावर मुंबईचा CSK कडून पराभव

Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात आपल्या होम ग्रांऊडवर खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहितने एकाकी झुंज दिली. मात्र त्याला इतर कुठल्याही खेळाडूकडून हवी तशी साथ मिळाली नाही.

मुंबई इंडियन्स संघाला हा सामनात जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. इशान किशन अवघ्या २३ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव दुसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तर तिलव वर्मा ३१, कर्णधार हार्दिक पंड्या २ आणि टिम डेव्हिड १२ धावांवर माघारी परतला. शेवटी कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र त्याचं शतक संघाला विजय मिळवून देऊ शकलं नाही.

चेन्नईने केल्या २०६ धावा..

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर २०६ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने ६९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले.

तर शिवम दुबेने ३८ चेंडूंचा सामना करत नाबाद ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एमएस धोनीने हार्दिक पंड्याच्या षटकात सलग ३ षटकार मारले. त्याने ४ चेंडूंत २० धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT