Kieron Pollard saam Tv
Sports

MI Emirates : UAE लीगसाठी मुंबई इंडियन्स टीमची घोषणा, पोलार्ड-ब्राव्होसह 'या' खेळाडूंचा केला समावेश

वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डसह अनेक स्टार खेळाडूंचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : युएईमध्ये होणाऱ्या टी-२० लीगमध्ये (UAE T-20 League) मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीचा MI एमिरेट्स संघ सहभाग घेणार आहे. या संघाने त्यांच्या स्क्वॉडमध्ये १४ खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डसह (Kieron Pollard) अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि युएईमध्ये होणाऱ्या टी-२० लीगसाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) संघाची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिकामध्ये MI केपटाऊन आणि युएईमध्ये MI एमिरेट्सचा संघ मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीचा भाग असणार आहे.

युएई टी-२० लीगसाठी मुंबई इंडियन्सच्या MI एमिरेट्सने अनेक खेळाडूंना साईन केलं आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सच्या एमिरेट्सच्या माध्यमातून शुक्रवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे. टीमने आतापर्यंत १४ खेळाडूंचा समावेश करुन घेतला आहे. यामध्ये चार खेळाडू वेस्ट इंडिजचे आहेत. तर तीन खेळाडू इंग्लंडचे, तीन अफगानिस्तान, एक स्कॉटलॅंड, एक नेदरलॅंड, एक-एक खेळाडू दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडचा सामील केला आहे.

  • कायरन पोलार्ड ( वेस्टइंडीज )

  • ड्वेन ब्राव्हो ( वेस्टइंडिज )

  • निकोलस पूरन ( वेस्टइंडिज )

  • ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड )

  • आंद्रे फ्लेचर ( वेस्टइंडिज )

  • इमरान ताहिर ( दक्षिण आफ्रिका )

  • समित पटेल ( इंग्लंड )

  • विल स्मीद (इंग्लंड )

  • जॉर्डन थॉम्पसन ( इंग्लंड )

  • नजीबुल्लाह जादरान ( अफगानिस्तान )

  • जहीर खान (अफगानिस्तान )

  • फजलहक फारुकी ( अफगानिस्तान )

  • ब्रेडली व्हील ( स्कॉटलॅंड )

  • बैस डे लीडे ( नेदरलॅंड्स )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT