रोहित शर्माची कमाल! धोनी आणि कोहलीला मागे टाकत बनला कॅप्टन नंबर १

टी२० मध्ये भारतीय संघाने २०१७ पासून आतापर्यंत ३५ सामने खेळले आहेत.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam Tv

नवी दिल्ली : रोहित शर्माने (Rohit Sharma) जेव्हापासून टीम इंडियाची कमान संभाळली आहे, तेव्हापासून टीम इंडीयाने जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्णधार राहित शर्माने टीमच्या विजयाचा ग्राफ उंचावला आहे. त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत टी२० मध्ये भारतीय संघाने २०१७ पासून आतापर्यंत ३५ सामने खेळले आहेत. यातील २९ सामने जिंकले आहेत. फक्त ६ सामने गमावले आहेत. कर्णधार शर्माच्या उपस्थितीत भारतीय संघाने टी२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जिंकण्याचे प्रमाण ८२.८५ टक्के आहे.

भारतीय टीम टी२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी याने सर्वात जास्त स्पर्धेत सामन्यात जिंकले आहेत. महेंद्र सिंह धोनी कर्णधार असताना सर्वात जास्तवेळा टीम जिंकली आहे. यानंतर विराट कोहलीचे नाव समोर येते. कोहलीच्या कारदिर्दीत भारतीय टीमने २०१७ पासून २०२१ पर्यंत ५० टी२० सामने खेळले आहेत. या दरम्यान टीमने ३० सामने जिंकले आहेत.

Rohit Sharma
धक्कादायक निर्णय! कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकलं गोल्ड मेडल; आता खेळच सोडला!

भारतीय संघाला सर्वाधिक टी२० सामन्यांमध्ये विजय मिळवून देणाऱ्या या दोन खेळाडूंनंतर रोहित शर्माचे नाव येते. रोहित शर्माने फार कमी वेळात कर्णधारपदाच्या बाबतीत धोनी आणि कोहलीला मागे टाकले आहे. या रेकॉर्डमधील एक विशेष विक्रम म्हणजे एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत त्याने भारताच्या या दोन कर्णधारांना मागे टाकले आहे.

Rohit Sharma
धक्कादायक निर्णय! कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकलं गोल्ड मेडल; आता खेळच सोडला!

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीने वर्ष २०१६ मध्ये सर्वाधिक १५ सामने जिंकले आहेत. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने १४ सामने जिंकले होते. पण रोहित शर्माने आता या दोन फलंदाजांना मागे टाकले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली यावर्षी २०२२ मध्ये टीम इंडियाने १६ सामने जिंकले आहेत.

महेंद्रसिंह धोनी - १५ विजय - २०१६

विराट कोहली - १४ विजय - २०१८

रोहित शर्मा - १६ विजय - २०२२

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com