India Vs Pakistan, Men's Hockey 5s Asia Cup 2023 final SAAM TV
Sports

India Vs Pakistan Hockey : जिंकलो रे...! रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया चषकावर कोरलं नाव

India Vs Pakistan, Men's Hockey 5s Asia Cup 2023 final : भारताने पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषकावर नाव कोरलं

Nandkumar Joshi

Men's Hockey 5s Asia Cup 2023 final, India Vs Pakistan :

भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानला लोळवून पुरुष हॉकी फाइव्ह्ज आशिया चषकावर नाव कोरलं. अंतिम सामना रोमहर्षक झाला. पॅनल्टी शूटआउटमध्ये गोल डागत पाकिस्तानला पराभूत करून भारतीय संघानं विजय मिळवला.

ओमानच्या सलालाहमध्ये भारतीय संघानं अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत पुरुष हॉकी फाइव्ह्ज आशिया कप २०२३ जिंकला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पॅनल्टी शूटआऊटमध्ये २-० ने नमवले. (Latest sports updates)

हाफ डावापर्यंत पाकिस्तान ३-२ ने आघाडीवर होता. त्यानंतर भारतीय संघानं दमदार पुनरागमन केलं. डावाच्या अखेरीपर्यंत पाकिस्तानशी बरोबरी साधली. दोन्ही संघांचे गुण ४-४ असे होते. शूटआऊटमध्ये भारताकडून मनिंदर सिंह आणि गुरज्योत सिंहने गोल डागले.

गोलकीपर सूरज करकेरा याने पाकिस्तानच्या अरशद लियाकत आणि मुहम्मद मुर्तजा याचे गोल रोखले. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून भारताने एफआयएच पुरुष हॉकी फाइव्ह्ज वर्ल्डकप २०२४ मध्ये दिमाखात प्रवेश केला.

भारताकडून मोहम्मद राहील (१९ आणि २६ व्या मिनिटाला), जुगराज सिंह (सातव्या), मनिंदर सिंह याने दहाव्या मिनिटाला गोल केले. तर गुरज्योत सिंह आणि मनिंदर सिंहने शूटआऊटमध्ये गोल डागले.

पाकिस्तानकडून निर्धारित वेळेत अब्दुल रेहमान, अब्दुल राणा, जिकरिया हयात आणि अरशद लियाकत याने गोल केले. तत्पूर्वी भारताने शनिवारी झालेल्या सेमिफायनलमध्ये मलेशियाला १०-४ अशा गुणफरकाने पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT