Australia team Saam Tv
Sports

Meg Lanning: वर्ल्डकप विजयाची हॅट्रिक करताच लेनिंगने रचला इतिहास!मोठ्या विक्रमात रिकी पॉंटिंग आणि धोनीला सोडलय मागे

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेतील दबदबा कायम ठेवत जेतेपदावर नाव कोरले आहे.

Ankush Dhavre

Meg Lanning World Record Women's T20 World Cup 2023: रविवारी आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने होते.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेतील दबदबा कायम ठेवत जेतेपदावर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी विजय मिळवला यासह विश्वचषक जिंकण्याची हॅट्रिकही केली आहे.

दरम्यान या विजयासह ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Latest sports updates)

मेग लेनिंग ही (Meg Lanning) ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. रविवारी तिच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलिया संघाने सहाव्यांदा ती-२० विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. तर कर्णधार म्हणून हे मेग लेनिंगचे पाचवे जेतेपद आहे.

यासह तिने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगचा ४ वेळेस जेतेपद जिंकण्याचा विक्रम मोडून काढला आहे. तसेच तिने एमएस धोनी आणि रिकी पॉंटिंगचा प्रत्येकी ३-३ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही मोडून काढला आहे.

ऑस्ट्रेलिया महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने २०१०, २०१२,२०१४,२०१८,२०२२ आणि २०२३ अशा ६ विश्वचषक स्पर्धांमध्ये जेतेपदाला गवसणी घातली आहे.

तसेच या सामान्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद १५६ धावा केल्या होत्या. यादरम्यान बेथ मुनीने ५३ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला गडी बाद १३७ धावा करता आल्या. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने १९ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT