VIRAL VIDEO twitter
Sports

Viral Video: मैं झुकेगा नहीं.. शतक झळकावताच डेव्हिड वॉर्नरचं 'पुष्पा'स्टाईल सेलिब्रेशन; Video व्हायरल

David Warner Viral Video: या सामन्यात शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने भन्नाट सेलिब्रेशन केलं आहे.

Ankush Dhavre

David Warner Pushpa Celebration:

बंगळुरूच्या चिन्नस्वामीच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने तुफान फटकेबाजी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील २१ वे शतक झळकावले आहे. हे शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नर पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने सुरूवातीपासूनच पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल करत तुफान फटकेबाजी केली.

त्याने या डावात १२४ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १२४ धावा केल्या. हे शतक साजरं केल्यानंतर तो पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करताना दिसून आला. यापूर्वी देखील तो अनेकदा मैदानावर असताना पुष्पा सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

रिकी पाँटिंगची केली बरोबरी..

डेव्हिड वॉर्नरचं हे शतक खास ठरलं आहे. कारण या शतकी खेळीसह त्याने वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगची आणि कुमार संगकाराची बरोबरी केली आहे. कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंगने वर्ल्डकप स्पर्धेत ५ शतके झळकावली आहेत. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा जोरदार विजय..

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने १२४ चेंडूंचा सामना करत १६३ धावांची खेळी केली होती. तर मिचेल मार्शने १०८ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची खेळी केली. या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ५० षटक अखेर ऑस्ट्रेलियाने ३६७ धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना इमाम उल हकने ७० धावांची खेळी केली. तर अब्दुल्ला शफिकने ६४ धावा केल्या. पाकिस्तानचा संपु्र्ण डाव ३०५ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT