वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा भारतीय संघासाठी सुपरस्टार ठरतोय. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे.
या सामन्यात त्याने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. दरम्यान निवृत्तीतून माघार घेणाऱ्या बेन स्टोक्सला त्याने सापळा रचत माघारी धाडले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बेन स्टोक्सची उडवली दांडी.. .
मोहम्मद शमीला दोन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो. अशीच काहीशी कामगिरी त्याने या सामन्यातही केली आहे. इंग्लंडचा संघ २३० धावांचा पाठलाग करण्यासाठी आला असताना ५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता.
या षटकातील चौथा चेंडू टप्पा पडून आत आला. तर पाचवा चेंडू टप्पा पडताच बाहेर निघाला. त्यानंतर मोहम्मद शमी ८ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातही एक चेंडू आत आणि दुसरा चेंडू बाहेर टाकून त्याने बेन स्टोक्सला विचार करायला भाग पाडलं.
बेन स्टोक्स पूर्णपणे गोंधळून गेला. त्यानंतर त्याने ८ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर राऊंड द विकेटचा मारा करत ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला जो टप्पा पडताच आत आला आणि बेन स्टोक्सची दांडी गुल करून गेला. (Latest sports updates)
भारतीय संघाचा जोरदार विजय..
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला होता. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावांचं बहुमूल्य योगदान दिलं. केएल राहुल ३९ धावांची खेळी करत माघारी परतला. भारतीय संघाने ५० षटकअखेर ९ गडी बाद २२९ धावा केल्या.
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला २३० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. लियाम लिविंगस्टनने २७ तर डेव्हिड मलानने १६ धावांचं योगदान दिलं.
या डावात भारतीय गोलंदाज चमकले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.