rohit sharma mark wood twitter
क्रीडा

Mark Wood Bouncer: ओह नो..मार्क वुडचा हेल्मेट तोड बाऊन्सर; रोहित थोडक्यात बचावला, Video

India vs England 3rd Test: इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज मार्क वुडने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर रोहितला आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

Ankush Dhavre

Mark Wood Bouncer To Rohit Sharma:

शॉर्ट बॉलवर पुल शॉट मारण्यात रोहित शर्मा तरबेज आहे. चेंडूची गती कितीही असू द्या, शॉर्ट बॉल पडताच चेंडू बॅटला लागुन स्टँड्समध्ये जात असतो. मात्र इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज मार्क वुडने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर रोहितला आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

राजकोटच्या मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मावर मार्क वुडने बाऊन्सरचा मारा केला.

पहिल्या डावातील १० व्या षटकात मार्क वुडने बाऊन्सर चेंडू टाकला, जो रोहित शर्माच्या हेल्मेटच्या ग्रीलला जाऊन लागला. या चेंडूने टप्पा पडताच इतकी उसळी घेतली की रोहितला अंदाजच आला नाही. चेंडू लागताच मार्क वुड विचारपूस करण्यासाठी रोहितकडे गेला. (Cricket news in marathi)

रोहितला बाद करण्यासाठी रचला होता सापळा...

रोहित शर्माने सरासरी धावा या पुल शॉटवर केल्या आहेत. शॉर्ट बॉल मिळताच तो पुल शॉट मारतो. मात्र हाच शॉट खेळताना तो अनेकदा बादही झाला आहे. या डावात रोहितला बाद करण्यासाठी बेन स्टोक्सने सापळा रचला होता. त्याने मागे २ क्षेत्ररक्षक ठेवत मार्क वुडला बाऊन्सरचा मारा करायला सांगितलं.

या चेंडूवर तो पुल करु शकला असता, मात्र त्याने असं काहीच केलं नाही. तो डिफेन्स करायला गेला. याच प्रयत्नात चेंडू त्याच्या हेल्मेटला जाऊन धडकला. मुख्य बाब म्हणजे रोहित शर्माला कुठलीही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT