Manu Bhaker-Suryakumar 
Sports

Manu Bhaker-Suryakumar : शूटींग सोडून आता मनू क्रिकेटर बनणार? सूर्याकडून घेतेय खास ट्रेनिंग, स्वतः केला खुलासा

Manu Bhaker-Suryakumar : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी दोन मेडल पटकावणाऱ्या मनू भाकरने टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी पहिला मेडल पटकावलं ते मनू भाकरने. केवळ एक नाही तर मनूने दोन कांस्य पदकाची कमाई केली. मात्र आता युवा नेमबाज मनू भाकरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. मनू आता क्रिकेटर बनण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसत आहे.

मनू भाकरने यापूर्वी अनेक खेळ खेळले आहेत आणि आता ती क्रिकेटमध्ये नशीब आजमवणार का असा सवाल चाहत्यांना पडला आहे. दरम्यान हा व्हायरल झालेला मनूचा फोटो सूर्यकुमारसोबतचा आहे.

मनू-सूर्याचा फोटो व्हायरल

मनूने सोशल मीडियावर पोस्ट करून टीम इंडियाच्या T20 कर्णधाराला भेटल्याची माहिती दिली आहे. यावेळी मनूने कॅप्शनमध्ये सांगितलं की, ती मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून फलंदाजीचं तांत्रिक ज्ञान घेतेय.

सध्या मनू भाकर काही काळ विश्रांतीवर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर मनूने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्टलच्या इंडीविजुअल आणि मिक्स टीम इवेंटमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव देखील ब्रेकवर आहे.

अनेक खेळ खेळलीये मनू

मनू एक प्रोफेशनल नेमबाज आहे, परंतु हा खेळ निवडण्यापूर्वी तिने इतर अनेक खेळांमध्ये नशीब आजमावलं होतं. मनूने शूटिंगपूर्वी मार्शल आर्ट्स, ज्युडो, बॉक्सिंगसारखे खेळ खेळले आहेत. मात्र, नंतर तिला नेमबाजीची खूप आवड निर्माण झाली आणि या खेळात तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या भेटीनंतर मनू आता क्रिकेट खेळणार का असा सवाल चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT