Manoj Tiwary: भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघातील खेळाडू मनोज तिवारीने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मनोज तिवारीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
मनोज तिवारी सध्या बंगालच्या क्रीडा मंत्र्यांची भूमिका पार पाडतोय. भारतीय संघासाठी २००८ मध्ये पदार्पण करणारा मनोज तिवारी गेल्या ८ वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. मात्र या कालावधीत तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून आला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:चा फोटो शेअर करत Thank You असं लिहिलं आहे. (Latest sports updates)
मनोज तिवारी आयपीएल स्पर्धेत देखील खेळताना दिसून आला आहे. त्याने या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेतील ९८ सामन्यांमध्ये त्याने १६९५ धावा केल्या आहेत.
मनोच तिवारीची कारकिर्द..
मनोज तिवारीला २००८ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पण केलं होतं. त्याला आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी १२ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. वनडे सामन्यांमध्ये त्याने २६.०९ च्या सरासरीने २८७ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतकी खेळी केली होती. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला केवळ १५ धावा करता आल्या. १५ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.