मना पटेल : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू  twitter/@ANI
Sports

माना पटेल : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्बिया आणि इटली येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेतला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : भारतीय महिला जलतरणपटू (Swimmer) माना पटेलची (Mana Patel) आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics) निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय जलतरणपटू ठरली आहे. विद्यापीठाच्या कोट्याअंतर्गत ऑलिम्पिकमध्ये मानाला प्रवेश मिळाला आहे. 21 वर्षीय मना 100 मीटर बॅकस्ट्रोक इव्हेंटमध्ये भाग घेईल. (Mana Patel: The first Indian woman swimmer to qualify for the Tokyo Olympics)

श्रीहरी नटराज (Shrihari Natraj) आणि साजन प्रकाश (Sajan Prakash) पात्र झाल्यानंतर माना टोकियो ऑलिम्पिकमधील देशातील तिसरी जलतरणपटू आहे. साजन प्रकाशने 200 मीटर बटरफ्लाय आणि श्रीहरी नटराज यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 'ए' गुण मिळविले. 'युनिव्हर्सिटी' कोट्यातून देशातील एक पुरुष आणि एक महिला स्पर्धकाला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली जाते.

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्बिया आणि इटली येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेतला होता. बेलग्रेडमधील 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तिने राष्ट्रीय विक्रम केला. बेलग्रेडमध्ये तिने 1 मिनिट 03 सेकंद पाण्याखाली काढले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 मिनिट 02 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ घेणे माझे ध्येय आहे. मला फक्त ऑलिम्पिकमध्ये अनुभव घ्यायचा आहे. मला कॉमनवेल्थ आणि आशियाई खेळात पदक जिंकण्याची चांगली संधी असेल. अशी भावनाही यावेळी मनाने व्यक्त केली आहे.

- क्रीडामंत्र्यांनी अभिनंदन केले

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी माना यांना टोकियो दौर्‍याबद्दल अभिनंदन केले आणि लिहिले की, “बॅकस्ट्रोक जलतरणपटू मना पटेल # टोक्यो -2020 पात्रता मिळविणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय जलतरणपटू बनली आहे.” मी युनिव्हर्सिटी कोट्यातून पात्र ठरलेल्या मनाचे अभिनंदन करतो. खुप छान.' अशा शब्दांत क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

- 2019 मध्ये दुखापतीनंतर मनाचे यावर्षी पुनरागमन

टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यानंतर मानाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, '' या खूप सुंदर भावना आहेत. मी ऑलिम्पिकविषयी सह जलतरणपटूंकडून ऐकले आहे आणि त्या दूरचित्रवाणीवर पाहिल्या आहेत. परंतु जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धेतील स्पर्धकांशी प्रतिस्पर्धा करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ''

दरम्यान 2019 मध्ये मना पटेलला ल दुखापत झाल्यामुळे तिने खेळातून माघार घेतली होती. मात्र यावर्षीच्या सुरुवातीलाच तिने खेळात पुनरागमन केले. ''महामारीमुळे लागलेल्या लॉकडाउनमुळे मला या आजारातून सवरण्यात मोठी मदत मिळाली. मला इतका काल पणीपासून दूर राहण्याची सवय नाही,'' अशी प्रतिक्रियाही यावेळी मनाने यावेळी दिली. दरम्यान, एप्रिलमध्ये उजबेकिस्तानात झालेल्या खुल्या चॅम्पियनशिपमध्ये मनाने 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 1 मिनिट 04.47 सेकंड स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT