MS Dhoni IPL 2023 Saam Tv
Sports

MS Dhoni IPL 2023: पुढची आयपीएल खेळणार की नाही?; महेंद्रसिंह धोनीचा खुलासा

आज दिवसभर महेंद्रसिंह धोनी पुढची आयपीएल खेळणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

साम वृत्तसंथा

मुंबई: यंदाच्या आयपीएल (IPl) सीझन मधून एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ बाहेर पडला आहे. सुरूवातीला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई संघाने यंदाच्या हंगामात खराब कामगिरी केली. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यात फक्त ४ विजय मिळवलेत. तर तब्बल ९ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुढच्या सीझनमध्ये एमएस धोनी चेन्नईच्या जर्सीमध्ये दिसणार की नाही या र्चा दिवसभर सुरु होत्या. आता चर्चांना महेंद्रसिंह धोनीने पूर्ण विराम दिला आहे.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएल मधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज चेन्नईचा राजस्थान रॉयल्स विरुध्दचा सामना सुरु आहे. या सामन्याच्या नाणेफेकीनंतर इयान बिशपने धोनीला पुढच्या सीझन विषयी प्रश्न विचारला. यावेळी धोनी ने हा आपला शेवटचा सामना नसल्याचे सांगितले. पुढच्या वर्षीही मी चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान सांभाळणार असल्याचे धोनीने सांगितले. त्याच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर धुमाकुळ सुरु झाला.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) उत्तर देताना म्हणाला, "नक्कीच मी पुढच्या हंगामात खेळेन कारण चेन्नईला नाही म्हणणे अयोग्य ठरेल." चेन्नई संघातून न खेळणे चेन्नईच्या चाहत्यांना आवडणार नाही. पुढील वर्षी संघांना विविध शहरांमध्ये फिरण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी चाहत्यांचे आभार मानण्याचीही संधी असेल जिथे आम्ही सामने खेळू, असंही धोनी म्हणाला.

महेंद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) चाहत्यांनी या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओसह पुढचा आयपीएल सीझन चेन्नई जिंकणार असल्याचा दावाही चाहते करत आहेत.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नई 4 वेळा चॅंम्पियन

एमएस धोनी (MS Dhoni) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकून दिली आहे. याशिवाय धोनीच्या नेतृत्वात 5 वेळा चेन्नई संघाने उपविजेतेपद देखील पटकावले आहे. एवढेच नाही तर धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही जिंकले होते. धोनीने आतापर्यंत 233 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये 39.30 च्या सरासरीने 4952 धावा केल्या आहेत. ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 135 झेल आणि 39 स्टंपिंग केले आहेत. धोनीशिवाय, दिनेश कार्तिक हा एकमेव यष्टिरक्षक आहे ज्याने आयपीएलमध्ये 150 हून अधिक खेळाडूंना बाद केलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT