MS Dhoni google
क्रीडा

IPL 2022 : महेंद्र सिंग धोनी करतोय गोलंदाजीचा सराव; गुजरात विरुद्ध आहे 'हा' मास्टर प्लॅन

नरेश शेंडे

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 2022) आतापर्यंत चारवेळा विजेतेपदाची माळ गळ्यात घालणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची (Chennai super kings) यंदाच्या मोसमात मात्र निराशाजनक सुरुवात झाली. परंतु, कर्णधार रविंद्र जडेजाच्या (Ravindra jadeja) नेतृत्वात चेन्नईची टीमने नुकत्याच झालेल्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यात पहिल्या विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे सलग चारवेळा पराभव पत्कारावा लागणाऱ्या चेन्नईचा आत्मविश्वास आता द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला (Mahendra singh dhoni) चेन्नईच्या पुढील सामन्यांमध्येही विजयाचं सातत्य कायम ठेवायचं आहे. त्यासाठी त्याने एक मास्टर प्लॅन केला असून तो स्वत: नेटमध्ये गोलंदाजीचा सराव (bowling practice) करत आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज सायंकाळी सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील कर्णधार नवखे आहेत. गुजरातची टीम आयपीएल २०२२ मध्ये नव्यानं दाखल झालेली आहे. हार्दीक पंड्या (hardik pandya) गुजरातचं (Gujrat titans) नेतृत्व करत असून मागील पाच सामन्यांमध्ये चारवेळा गुजरातने विजय मिळवला आहे. दरम्यान, चेन्नईचा पराभव करण्यासाठी गुजरातनेही गेम प्लॅन केला आहे.

धोनीनं केला नेटमध्ये गोलंदाजीचा सराव

सीएसके आणि बीसीसीआई दोघांनी धोनीची एक व्हिडिओ क्लिप शनिवारी पोस्ट केलीय. या व्हिडिओमध्ये नेटमध्ये नेहमी फलंदाजीचा सराव करणारा धोनी यावेळी मात्र हातात चेंडू घेवून गोलंदाजीचे धडे गिरवताना दिसला. नेटमध्ये धोनीला गोलंदाजी करताना क्रिकेट चाहत्यांना पाहिलं. त्यानंतर धोनी नक्कीच गुजरातच्या विरोधात गेम प्लॅन करत आहे, असा अंदाज त्यांच्या चाहत्यांनी बांधला. चेन्नईच्या आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत नेटमध्ये लेग स्पिन गोलंदाजी करताना धोनी कॅमेरात कैद झाला आहे.

दोन कर्णधारांमध्ये होणार टक्कर

गुजरात आणि चेन्नईच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांकडे भारतीय संघासोबत दिर्घकाळ खेळल्याचा अनुभव आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएलच्या या मोसमात कमालीचा फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या सिजनमध्ये त्याने दोन वेळा अर्धशतक ठोकले आहेत. तसंच चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजाही आक्रमक फलंदाज असून आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेक दिग्गज खेळाडूंना त्याने तंबुत पाठवलं आहे. त्यामुळे आज सायंकाळी पुण्यात होणाऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. सीएसकेचा सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये पराभव झाला. त्यामुळे गुणतालिकेत खालच्या स्थानावर असलेल्या सीएसकेला आजच्या सामन्यात विजय मिळवणं महत्वाचं ठरणार आहे. गुजरातला ८ गुण मिळाल्याने ते सेफ साईडला आहेत.

गुजरातच्या फलंदाजांना रोखणार धोनी

गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यासाठी धोनी लेग स्पिनर्सला अधिक प्राधान्य देत आहे. आयपीएलचा गेल्या काही वर्षांचा आपण इतिहास पाहिला तर, लेग स्पिनर्सने अप्रतिम कामगिरी केलीय. विशेष म्हणजे गुजरातचा लेग स्पिनर राशिद खानने प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांना डग आऊटचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे लेग स्पिनरच्या गोलंदाजीला सामोरं जाऊन संघांसाठी जास्तीत जास्त धावा करण्यासाठीही धोनीनं गेम प्लॅन केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT