IPL 2022: IPL तो झांकी है, टीम इंडिया बाकी है; DK चा व्हिडिओ व्हायरल

16 एप्रिलच्या संध्याकाळी झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुमारे 195 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
Dinesh Kartik
Dinesh Kartik Saam TV
Published On

IPL 2022 मध्ये एक खेळाडू आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावीत करत आहे. तशी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेटचे मोठे स्टार्स त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्या व्हिडिओची टॅग लाईन आहे- 'जर ध्येय मोठे असेल तर कोणीही एकटे नसते.' दिनेश कार्तिकचेही (Dinesh Kartik) ध्येय मोठे आहे. आणि त्याचे हे मोठे ध्येय साध्य करण्यात तो एकटा नाही. उलट त्याचा खेळ त्याच्यासोबत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये खेळणाऱ्या उर्वरित संघांची ताकद बनलेला फॉर्म. दिनेश कार्तिकच्या सुरेख फॉर्मचा दिल्ली कॅपिटल्स हा बळी ठरला आहे. या संघाविरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकल्यानंतर दिनेश कार्तिकने आपले नक्की ध्येय काय आहे हे सर्वांसमोर आणले आहे. तो म्हणाला, 'आयपीएल 2022 ही फक्त एक झलक आहे, त्याला टीम इंडियामध्ये (Team India) स्थान मिळवायचे आहे.'

16 एप्रिलच्या संध्याकाळी झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुमारे 195 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने 47 मिनिटे फलंदाजी केली आणि यादरम्यान त्याने 34 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. कार्तिकने आपल्या स्फोटक खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. म्हणजेच त्यावे फक्त चौकार षटकाराने अवघ्या 10 चेंडूत 50 धावा केल्या.

दिनेश कार्तिकचे ध्येय टीम इंडिया!

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिनेश कार्तिकची स्फोटक खेळी तुम्ही पाहिली असेलच. आता तो नक्की त्यावर काय बोलला हे ही जाणून घ्या. दिनेश कार्तिक म्हणाला, “माझे ध्येय मोठे आहे. त्याला मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. देशासाठी काहीतरी मोठं करायचं हे माझं ध्येय आहे. हा माझ्या क्रिकेट प्रवासाचा एक भाग आहे. मला पुन्हा भारतीय संघात स्थान हवे आहे आणि त्यासाठी मी सर्वकाही देईन.

Dinesh Kartik
IPL 2022 Point Table: लखनौ-बंगळुरूच्या विजयांनतर मोठे बदल, MI ला प्लेऑफची संधी?

कार्तिकचे मोठे विधान आणि त्याचा अर्थ

दिनेश कार्तिकच्या विधानात दोन गोष्टी आहेत. आधी त्याला टीम इंडियात स्थान मिळवायचे आहे. दुसरे म्हणजे, त्याला क्रिकेटमुळे आपल्या देशासाठी काहीतरी करायचे आहे. याचा अर्थ भारताच्या झोळीत मोठे जेतेपद टाकण्याचा त्याचा मानस आहे. साहजिकच त्याचा रोख आगामी T20 विश्वचषकाकडे निर्देश करत आहेत, जो या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com