IPL 2022 Point Table: लखनौ-बंगळुरूच्या विजयांनतर मोठे बदल, MI ला प्लेऑफची संधी?

आयपीएलमध्ये शनिवारी दोन सामने झाले. आणि या दोन्ही सामन्यांचा परिणाम गुणतालीकेवर दिसून आला.
IPL 2022 Point Table
IPL 2022 Point TableSaam TV

IPL 2022 सुरू होण्यापुर्वी कोणीही विचार केला नसेल की यंदाच्या वर्षी नव्याने सामिल झालेले दोन नवे संघ गुणतालीकेत अव्वल क्रमांकावर असतील. मात्र या हंगामातील 3 आठवडे आणि 27 सामन्यांनंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांनी शनिवारी, 16 एप्रिल रोजी झालेल्या डबल हेडर सामन्यांनंतर गुणतालिकेत (IPL 2022 Point Table) पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. या दोन्ही नव्या संघांनी आतापर्यंत दमदार खेळ दाखवला आहे. त्याचवेळी आरसीबीच्या संघाने काल सामना जिंकत आपणही विजेते पदाचे दावेदार आहोत हे दाखवून दिले आहे.

आयपीएलमध्ये शनिवारी दोन सामने झाले. आणि या दोन्ही सामन्यांचा परिणाम गुणतालीकेवर दिसून आला. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला, जिथे कर्णधार केएल राहुलच्या शानदार शतकाच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी संघर्ष करत असलेल्या मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. लखनौचा हा 6 सामन्यांमधला चौथा विजय होता, तर मुंबईने सर्व 6 सामने गमावले आहे. दुसरीकडे, वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला आणि त्यानंतर जोश हेझलवूडच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर चौथा विजय नोंदवला.

समान शीर्ष 4 स्थान

या दुहेरी हेडरनंतर प्लेऑफसाठीची स्पर्धा अधिक खडतर झाली आहे. लीग स्टेजच्या शेवटी अव्वल चार संघांना प्लेऑफसाठी खेळण्याची संधी मिळणार आहे. तीन आठवडे आणि 27 सामने झाले असले तरी अजून प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले नाहिये. गुजरात, लखनौ आणि बंगळुरूचे प्रत्येकी 8 गुण आहेत, परंतु नेट रनरेटमधील फरकामुळे गुजरात प्रथम, लखनौ द्वितीय आणि बंगळुरू तिसरे आले आहे. शनिवारच्या सामन्यांपूर्वी लखनौ पाचव्या, तर बेंगळुरू सहाव्या स्थानावर होते. आता दोघांनी प्रत्येकी तीन स्थानांची झेप घेतली आहे. याचबरोबर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर असून, त्यांचे 6 गुण आहेत.

आजचे सामने महत्त्वाचे

आज पुन्हा डबल हेडर सामना पाहायसा मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे. या दोघांपैकी जो संघ जिंकेल त्याला 8 गुण मिळतील आणि ते टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. तथापि, हैदराबादचा रन रेट अजूनही निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते केवळ चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकतिल, तर पंजाबचा रनरेट चांगला आहे त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतील. त्याच वेळी, संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना आहे. जर गुजरातने हा सामना जिंकला तर ते 2 गुणांची आघाडी घेऊन अव्वल स्थानावर आपले स्थान मजबूत करतील.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com