Maharashtra Kesari Saam Tv
Sports

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

Maharashtra Kesari: कोरोनानंतर दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा आखाडा भरणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

पुणे: महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धा साताऱ्यात पार पडणार आहे. 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. नियमावली कुस्तीगीर परिषदेनं जाहीर केली आहे. 5 तारखेला या स्पर्धेचा जंगी उद्घाटन होणार आहे. कोरोनानंतर दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा आखाडा भरणार आहे.

महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सातारा (satara) जिल्ह्यातील मानबिंधू असणा-या सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात रंगणार आहे. ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिले कास्य पदक मिळवून देणा-या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणार असल्याने साता-याच्या क्रीडाक्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

कै.मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी सभा 10 तारखेला पार पडली होती. ६४ वी वरिष्ठ गट गादी माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 'किताब लढत' 5 ते 9 एप्रिलपर्यंत साता-यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. जुनियर व सब जुनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल भोसरी , पिंपरी चिंचवड येथे 18 मार्च ते 20 मार्च या काळात पार पडली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Shocking : संतापजनक! "तुझी बायको चेटकीण" गावकऱ्यांनी कुटुंबाला जाळलं; दोन महिन्याच्या बाळासह तिघांचा मृत्यू

Pune Tourism : मराठ्यांचा पराक्रम, शौर्य अन् स्वाभिमानाचे प्रतीक पुण्यातील 'हा' किल्ला; आजही जपतोय ऐतिहासिक वारसा

Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

SCROLL FOR NEXT