maharashtra kesari wrestling competition in satara saam tv
Sports

Maharashtra Kesari: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या साता-यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

या स्पर्धेमुळे सातारा जिल्ह्यातील नवाेदित मल्लांना प्राेत्साहन मिळेल.

Siddharth Latkar

सातारा : कुस्तीप्रेमी प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) कुस्ती (wrestling) स्पर्धेची तारीख आणि स्थळ नुकतेच राज्य कुस्तीगीर परिषदेने निश्चित केले आहे. त्यानूसार येत्या चार एप्रिलपासून ही स्पर्धा सातारा (satara) जिल्ह्यातील मानबिंधू असणा-या सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात (district sports complex satara) रंगणार आहे. (maharashtra kesari wrestling competition latest marathi news)

ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिले कास्य पदक मिळवून देणा-या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती (maharashtra keasri kusti competition) स्पर्धेचे आयाेजन हाेणार असल्याने साता-याच्या क्रीडाक्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

(कै.) मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी सभा गुरुवारी (ता.१०) झाली. या सभेत महाराष्ट्र केसरी कुस्ती (sports) स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. त्यानूसार ६४ वी वरिष्ठ गट गादी माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 'किताब लढत' चार ते नऊ एप्रिलपर्यंत साता-यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्याचे निश्चित करण्यात आले.

तसेच जुनियर व सब जुनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी भोसरी (पिंपरी चिंचवड) येथील मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल येथे १८ ते २० एप्रिल या कालावधीत हाेईल. याबाबतची माहिती कुस्तीगीर परिषदेच्या कार्यालयातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT