Shivraj Rakshe  Saam tv
Sports

Shivraj Rakshe : कुस्तीच्या आखाड्यात राजकारणाचा डाव? पंचांनी घेतली आक्रमक भूमिका

Shivraj Rakshe latest news : अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोलट लागलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये मोठा राडा झाला. या सामन्यात मल्ल शिवराज राक्षेला चितपट घोषित केल्यानंतर त्याने आक्षेप घेतला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात पंचाला लाथ मारली. शिवराजने लाथ मारल्यानंतर आखाड्यात एकच गोंधळ झाला. या प्रकारानंतर स्पर्धेच्या पंचांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शिवराज राक्षेवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्यानंतर वातावरण तापलं आहे. शिवराज राक्षेने लाथ मारल्यानंतर पंचांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवराज राक्षेवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आखाड्यावरून उठणार नाही. शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याने सर्व पंचांनी निर्णय घेतला आहे. तर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हलणार नसल्याची भूमिका घेतली. सर्व पंचाच्या निर्णयाने वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवराज राक्षेवर गुन्हा होणार?

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील प्रकरणावर राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोडवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप भोडवे म्हणाले, 'महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनल सामना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. दोघांमध्ये सामना सुरु असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला चितपट केले होते. मात्र, हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नव्हता. त्यामुळे राक्षेने पंत दत्तात्रय माने यांच्याशी वाद घातला'.

'शिवराज राक्षेने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ आता सर्व पंचांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली. त्यानंतर बैठकीत शिवराज राक्षे यावर गुन्हा दाखल करावा का नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोडवे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT